हातावर रवींद्र आणि हनुमानाचे चित्र असलेला टॅटू, नवी मुंबईतील मृतदेहाचं गूढ कसं उकललं?

| Updated on: Sep 17, 2021 | 11:48 AM

नवी मुंबई एपीएमसी परिसरात तीन दिवसांपूर्वी मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते. शीर, धड आणि हात पाय हे अगदी क्रूरतेने कापून पुरावा नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. त्यामुळे मृतदेह सापडून आला तरी मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपीला अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, हातावर रवींद्र आणि हनुमानाचे चित्र असलेल्या टॅटूवर पोलिसांची नजर पडली आणि तपास यंत्रणेने वेग घेतला.

हातावर रवींद्र आणि हनुमानाचे चित्र असलेला टॅटू, नवी मुंबईतील मृतदेहाचं गूढ कसं उकललं?
Navi Mumbai Murder Mystery
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईत एपीएमसी मार्केट परिसरात माथाडी चौकाजवळ कोपरीगावाकडे जाणाऱ्या गटारीत निळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, केवळ हातावर रविंद्र नावाच्या टॅटूवरून पोलिसांनी आपली चक्रे फिरवली आहेत. दोन दिवसातच पोलिसांनी घणसोली परिसरातून सुमित कुमार चव्हाण नामक इसमाला ताब्यात घेतले आहे. 

हातावर रवींद्र आणि हनुमानाचे चित्र असलेला टॅटू

नवी मुंबई एपीएमसी परिसरात तीन दिवसांपूर्वी मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते. शीर, धड आणि हात पाय हे अगदी क्रूरतेने कापून पुरावा नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. त्यामुळे मृतदेह सापडून आला तरी मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपीला अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, हातावर रवींद्र आणि हनुमानाचे चित्र असलेल्या टॅटूवर पोलिसांची नजर पडली आणि तपास यंत्रणेने वेग घेतला. नवी मुंबई पोलीस एसीपी विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील 100 हुन अधिक मिसिंग तक्रारी लक्षात घेऊन मयताच्या वर्णनाशी मिळती जुळती व्यक्ती कोपरखैरणे परिसरातून मिसिंग असल्याचे आढळून आले. यावर परिसरातील सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करुन सुमितकुमार हरिशकुमार चव्हाण याला अटक करण्यात आली. आरोपीचे मयत व्यक्तीशी मैत्रीचे संबंध होते. परंतू आर्थिक देवाण-घेवाण आणि जुन्या भांडणातून आरोपीने मयताचा दारु पाजून खून केल्याचे निष्पन्न झाले.

नेमकं काय घडलं?

एपीएमसी मार्केट परिसरात माथाडी चौकाजवळ कोपरीगावाकडे जाणाऱ्या गटारीत निळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दोन दिवसातच पोलिसांनी सुमितकुमार चव्हाण याला ताब्यात घेतले होते. आरोपीने गुन्हा कबुली दिली असून त्यावर संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मानवी शरीराच्या मिळालेल्या अवयवानुसार उजवा आणि डावा हात कोपरापासून तोडलेल्या स्थितीत, उजवा आणि डावा पाय गुडघ्यापासून तोडलेल्या स्थितीत, उजव्या आणि डाव्या मांडीचे दोन तुकडे आणि डाव्या पायात काळ्या रंगाचा धागा बांधलेला होता. मृतदेहाचे बारीक-बारीक तुकडे केल्याने मृतदेहाची ओळख पटणे अवघड जात असून सुद्धा एपीएमसी पोलिसांनी केवळ दोन दिवसात हे काम केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहा पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक कडाळे, वसिम शेख, टकले, शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक आव्हाड, पोलीस हवालदार जगन्नाथ धुमाळ, पोलीस नाईक सुधील कदम, पाटील, नलावडे, पोलीस शिपाई विलास भोर व अमोल भोसले यांनी ही कामगिरी पार पाडली.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई एपीएमसी परिसरात मृतदेहाचे तुकडे करुन गटारात फेकणारा आरोपी गजाआड

शामकांत नाईकांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा, मुलाचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन