नवी मुंबई एपीएमसी परिसरात मृतदेहाचे तुकडे करुन गटारात फेकणारा आरोपी गजाआड

आरोपी सुमित कुमार चव्हाण याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने शीर आणि धड दुसऱ्या ठिकाणी फेकले आहे. पोलिस आरोपीला घेऊन संपूर्ण मृतदेह गोळा करत आहेत.

नवी मुंबई एपीएमसी परिसरात मृतदेहाचे तुकडे करुन गटारात फेकणारा आरोपी गजाआड
नवी मुंबई एपीएमसी परिसरात मृतदेहाचे तुकडे करुन गटारात फेकणारा आरोपी गजाआड

नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत एपीएमसी मार्केट परिसरात माथाडी चौकाजवळ कोपरीगावाकडे जाणाऱ्या गटारीत निळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, केवळ हातावर रविंद्र नावाच्या टॅटूवरून पोलिसांनी आपली चक्रे फिरवली आहेत. दोन दिवसातच पोलिसांनी घणसोली परिसरातून सुमित कुमार चव्हाण नामक इसमाला ताब्यात घेतले आहे. या घटनेत आणखी किती जणांचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. (Accused arrested for dumping body in Navi Mumbai APMC premises)

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

आरोपी सुमित कुमार चव्हाण याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने शीर आणि धड दुसऱ्या ठिकाणी फेकले आहे. पोलिस आरोपीला घेऊन संपूर्ण मृतदेह गोळा करत आहेत. संपूर्ण अवयवांचे तुकडे-तुकडे असल्याने मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे जोरदार प्रयत्न सुरु होते. संबंधित मृतदेह हा 30 ते 35 वयाच्या व्यक्तीचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. तर मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करत होते. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता.

तीन दिवसांपूर्वी मयत तरुण बेपत्ता झाला

मिळालेल्या माहितीनुसार रवी उर्फ रवींद्र कोपरी गावात राहत होता. तीन दिवसांपूर्वी रविंद्र घरी न परतल्याने नातेवाईकांनी कोपरखैरने पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार दोघे एकमेकांना ओळखत होते आणि पैशाच्या वादातून आरोपीने असे कृत्य केले. पोलिसांनी घणसोलीमधून सुमित कुमार चव्हाणला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत. अद्याप मृतदेहाचे शीर आणि धड मिळाले नाही.

मृतदेहाचा उजवा व डावा हात कोपरापासून तोडला असून, उजवा व डावा पाय गुडघ्यापासून तोडला आहे. उजव्या व डाव्या मांडीचे दोन तुकडे केले होते. डाव्या पायात काळ्या रंगाचा धागा बांधला होता. तर या अज्ञात मानवी इसमाबाबात काही माहिती मिळाल्यास एपीएमसी पोलीस ठाण्यात संपर्क करा असे आव्हान एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांनी केले होते. तुकडे केल्याने मृतदेहाची ओळख पटणे अवघड जात असून सुद्धा एपीएमसी पोलिसांनी केवळ दोन दिवसात सुमितला घणसोली येथून ताब्यात घेतले तर शीर आणि धड अजून मिळाले नाही. आरोपीला अटक केल्याने नवी मुंबई पोलिसांचे कौतुक होत असून एपीएमसी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखा लवकरच इतर आरोपींना अटक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accused arrested for dumping body in Navi Mumbai APMC premises)

इतर बातम्या

महिंद्रा, टाटा, मारुतीकडे कुठला ‘देशी’ मंत्र होता की तो Ford ला शेवटपर्यंत सापडला नाही? वाचा सविस्तर

केवळ परप्रांतीयच गुन्हे करतात का ? टार्गेट करणे योग्य नाही, ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI