महिंद्रा, टाटा, मारुतीकडे कुठला ‘देशी’ मंत्र होता की तो Ford ला शेवटपर्यंत सापडला नाही? वाचा सविस्तर

अमेरीकन कंपनी फोर्ड (Ford) आता भारतात कार बनवणार नाही. जनरल मोटर्सनेही चार वर्षापूर्वी असाच देशातून काढता पाय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न चर्चिला जातोय. विदेशी कंपन्यांना आपल्या देशात व्यापार का करता आला नाही?

महिंद्रा, टाटा, मारुतीकडे कुठला 'देशी' मंत्र होता की तो Ford ला शेवटपर्यंत सापडला नाही? वाचा सविस्तर

मुंबई : अमेरीकन कंपनी फोर्ड (Ford) आता भारतात कार बनवणार नाही. जनरल मोटर्सनेही चार वर्षापूर्वी असाच देशातून काढता पाय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न चर्चिला जातोय. विदेशी कंपन्यांना आपल्या देशात व्यापार का करता आला नाही? त्यांना नेमकी समस्या कशाची आहे? जगभरातल्या ज्या मोठ्या कार बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांची भारतीय कार बाजारातली हिस्सेदारी फक्त 6 टक्के एवढी आहे. फोर्डचाच आकडा पहायचा तर तो फक्त 2 टक्के एवढा आहे. पण माध्यमांमध्ये जी चर्चा सध्या रंगलीय, ती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. एक गट असा आहे देशात, जो फोर्ड किंवा जनरल मोटर्स अशा कंपन्यांनी गाशा गुंडाळणं सरकारी धोरणांचं अपयश मानतो. पण दुसरा एक गट असाही आहे आणि जो मोठा आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की, देशी कंपन्यांनी विदेशी कंपन्यांना बोऱ्या बिस्तर गुंडाळायला भाग पडलं. खरं तर वास्तव पाहिलं तर हे दोन्ही मतं हे काहीशी अतिशोयक्ती आहेत. (Which Desi Mantra Mahindra, Tata, Maruti have that Ford did not find till the end?)

काही आकडे बघितले आणि गेल्या 25 वर्षातल्या कार बाजारावर लक्ष दिलं तर हे स्पष्ट दिसतंय की, फोर्ड, जनरल मोटर्स अशा कंपन्यांना टाटा किंवा महिंद्राकडून तशी फार टक्कर मिळालीच नाही. त्याऊलट मारुती सुझुकी आणि ह्युंडईने मात्र नाकेनऊ आणले. फोर्ड तसच जनरल मोटर्सनं देश सोडण्याची अनेक कारणं आहेत. पण सर्वात महत्वाचं कारण आहे. त्या सेगमेंटवर लक्ष केंद्रीत न करणं ज्यात कार्सची सर्वाधिक विक्री होते. आपल्या देशात 3 ते 5 लाखांच्या दरम्यान ज्या कारची किंमत आहे, त्यांची सर्वात जास्त विक्री होते. फोर्डकडे ह्या रेंजमधलं एकही मॉडेल नव्हतं. ह्या सेगमेंटमध्ये फोर्डकडे एक फ्रिस्टाईल कार होती, जिची किंमतच 6 लाखापासून सुरु होते. त्या तुलनेत मारुती आणि इतर कंपन्यांकडे मात्र ऑल्टो, वॅगनआर, स्विप्ट अशा कार उपलब्ध आहेत.

800 सीसीवाल्या कारमध्ये विदेशी कंपन्या पिछाडीवर

भारतात सर्वात मोठा कारचा बाजार हा 800 CC च्या कारचा आहे. फोर्डकडे ह्या सेगमेंटमध्ये फक्त दोन गाड्या होत्या. फिगो आणि फ्रिस्टाईल. तर हुंडईकडे अनेक फिचर असलेली i20, सुझुकीची स्विप्ट, बलेनो, टाटा मोटर्सची टियागो, अल्ट्रोज या गाड्यांचा ह्या सेगमेंटवर कब्जा आहे. ग्राहकांना पाच लाखांच्या आत एवढे पर्याय असताना, फोर्डची 6 लाख किंमतीनं सुरुवात होणारी गाडी कोण विकत घेणार? सुझुकीची ऑल्टो सव्वा तीन लाखांपासून सुरु होते. या लहान कारच्या बळावरच मारुतीची कार मार्केटमधली हिस्सेदारी 67 टक्के एवढी आहे.

मग महिंद्रा कशी टिकली?

ज्या रेंजमध्ये फोर्डच्या गाड्या आहेत, त्याच रेंजमध्ये महिंद्राच्या गाड्याही आहेत. याचाच अर्थ फोर्ड परवडत नाही म्हणून निघून गेली पण त्याच रेंजमध्ये महिंद्राचा मात्र दबदबा आहे. खरं तर महिंद्रा छोट्या कारच्या सेगमेंटमध्ये कामच करत नाही. महिंद्राची मल्टी युटिलिटी व्हेईकल, एसयूव्ही सेगमेंटमध्ये पकड आहे. त्यात महिंद्राच्या मॉडेल्सचे पर्यायही अनेक आहेत. महिंद्रा यावरच थांबलेली नाही. 6 ते 10 लाखाच्या रेंजमध्ये इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी महिंद्रानं केयूव्ही, टीयूबीसारखे मॉडेल मार्केटमध्ये उतरवलेले आहेत.

मारुतीची हनुमान उडी

भारतीय बाजारात मारुतीचा दबदबा आहे. खरं तर ते महाराजे आहेत म्हटलं तरी चालेल. कारण छोट्या कारच्या सेगमेंटमध्ये मारुतीची हिस्सेदारी 67 टक्के आहे तर कॉम्पॅक्ट कारच्या सेगमेंटमध्ये 64 टक्के बाजार मारुतीचाच आहे. पण गेल्या काही काळात त्यातही घट होताना दिसतेय. 2018 साली एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुतीकडे 26 टक्के मार्केट होतं, आता त्यात घट होऊन ते 14 टक्क्यांवर आलंय.

फोर्डच्या जाण्याची 2 कारणे

फोर्डनं गाशा गुंडाळलाय. त्याचा फटका 4 हजार कर्मचाऱ्यांना बसतोय. त्यातही फक्त भारतात कार बनवणार नाही पण इंजिन पार्ट बनवण्याचं काम सुरुच राहील असं फोर्डनं म्हटलंय. फोर्डच्या जाण्याची प्रामुख्यानं दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे कोरोनामुळे भारतीय कार बाजारात आलेली मंदी आणि दुसरं फोर्डचा महिंद्रासोबतचा करार संपणं. गेल्या दशकभरात फोर्डनं भारतीय बाजारात मोठी गुंतवणूक केली होती पण तरीही कंपनीला 2 अब्जांचं नुकसान झालं. चालू वर्षी फोर्डची भारतीय बाजारातली हिस्सेदारी 2 टक्के झाली. कंपनीची जी क्षमता होती त्याच्या फक्त 20 टक्केच वापर होत होता. कोरोनामुळे निर्यात 55 टक्क्यानं घटली.

फोर्डचं म्हणणं काय? आकडे काय सांगतात?

फोर्डने भारतात आपला व्यवसाय बंद करण्याबाबत केलेल्या युक्तिवादांपैकी एक असा होता की भारतातील कार बाजार सुस्त आहे, परंतु जर आपण आकडे पाहिले तर ते एक वेगळीच कथा सांगतात. भारतातील कार बाजारात 80 टक्के वाटा असणाऱ्या मारुती सुझुकी, ह्युंडई मोटर्स आणि टाटा मोटर्ससह तीन मोठ्या कंपन्या मोठ्या संख्येने नवीन खरेदीदार बाजारात येत असल्याचा दावा करतात. जर आपण मारुती सुझुकीच्या खरेदीदारांवर नजर टाकली तर ती 2020-21 या आर्थिक वर्षात वाढून 47 टक्के झाली आहे, जी 2019-20 मध्ये 43 टक्के होती. ह्युंडई मोटर इंडियाच्या खरेदीदारांमध्येही हीच वाढ नोंदवण्यात आली आहे. 2019 मध्ये, जिथे त्यांची विक्री 32 टक्के होती तीच विक्री आता 40 टक्क्यांवर गेली आहे.

पॅसेंजर व्हीकल मार्केटमध्ये वाढ होण्याची शक्यता

मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर. सी. भार्गव यांचे मत आहे की, सध्या भारतातील प्रवासी कार बाजारात वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. वास्तविक आर. सी. भार्गव म्हणतात की, जर ऑटोमोबाईल उद्योगाला अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्राला चालना द्यायची असेल तर देशातील कारची संख्या प्रति 1000 लोकांमागे 200 असायला हवी, जी सध्या 25 ते 30 आहे. यासाठी दरवर्षी लाखो कार बनवण्याची गरज आहे.अलीकडेच आर.सी. भार्गव, ऑटोमोबाईल उद्योग संस्था सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या 61 व्या परिषदेला संबोधित करताना म्हणाले होते की, सरकारे ऑटो उद्योगाला पाठिंबा देण्याबाबत मोठी चर्चा करत असतात, पण जेव्हा योग्य पावले उचलण्याची वेळ येते, तेव्हा ग्राऊंड लेव्हलवर असं काहीच पाहायला मिळत नाही. भार्गवर म्हणाले की, ऑटो मोबाईल उद्योग बऱ्याच काळापासून मोठी घट पाहतोय, त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

इतर बातम्या

महिंद्राच्या शानदार SUV वर 2.63 लाखांचा डिस्काऊंट, ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Which Desi Mantra Mahindra, Tata, Maruti have that Ford did not find till the end?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI