Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

तुमच्या आवडत्या मोटरसायकल ब्रँडने काही मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. रॉयल एनफील्डने आपल्या हिमालयन एडीव्हीच्या (Royal Enfield Himalayan ADV) किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता 'या' बाईकची किंमत वाढली
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 3:57 PM

मुंबई : तुमच्या आवडत्या मोटरसायकल ब्रँडने काही मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. रॉयल एनफील्डने आपल्या हिमालयन एडीव्हीच्या (Royal Enfield Himalayan ADV) किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यावर्षी जुलैमध्ये दरवाढ केल्यानंतर काही महिन्यांनी ही नवी दरवाढ झाली आहे. नवीन किंमती वाढल्यानंतर, मोटारसायकल आता 2,10,784 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध आहे, ही किंमत आधी 2,05,784 रुपये इतकी होती. (After Meteor 350, Royal Enfield hikes prices of Himalayan ADV in India)

दरवाढीव्यतिरिक्त मोटरसायकलमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रॉयल एनफील्डच्या या शानदार बाईकमध्ये 411 सीसी सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन मिळते जे 6,500 आरपीएमवर 24.3 बीएचपी मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. त्याचे इंजिन 4,500rpm वर 32Nm पीक टॉर्क निर्माण करते. रॉयल एनफील्डच्या ADV च्या काही खास वैशिष्ट्यांमध्ये हॅलोजन हेडलाइट, सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, दोन्ही चाकांवर सिंगल डिस्क आणि स्विचेबल ABS यांचा समावेश आहे.

हिमालयन एडीव्हीच्या नव्या किंमती (एक्स-शोरूम, मुंबई)

  • मिराज सिल्व्हरची किंमत आधीच्या 2,05,784 रुपयांच्या तुलनेत 2,10,784 रुपये इतकी झाली आहे.
  • ग्रॅनाइट ग्रेची किंमत 2,10,784 रुपये झाली आहे, जी आधी 2,05,784 रुपये होती.
  • लेक ब्लूची किंमत आधीच्या 2,09,529 रुपयांच्या तुलनेत 2,14,529 रुपये इतकी झाली आहे.
  • रॉक रेडची किंमत आधीच्या 2,09,529 रुपयांच्या तुलनेत 2,14,529 रुपये इतकी झाली आहे.
  • ग्रॅनाइट ब्लॅकची किंमत आधीच्या 2,13,273 रुपयांच्या तुलनेत 2,18,273 रुपयांवर गेली आहे.
  • पाइन ग्रीनची किंमत आधीच्या 2,13,273 रुपयांच्या तुलनेत 2,18,273 रुपये इतकी झाली आहे.

Royal Enfield Meteor 350 ची किंमत वाढली

रॉयल एनफील्डने अलीकडेच Meteor 350 मोटारसायकलच्या किंमती देखील अपडेट केल्या. बेस फायरबॉल Meteor 350 ची किंमत आता 1.99 लाख रुपयांपासून सुरू होते, तर मिड-स्टेलर व्हेरिएंटची किंमत आता 2.05 लाख रुपये आहे. टॉप-स्पेक सुपरनोव्हा व्हेरिएंट आता 2.15 लाख रुपये किंमतीला विकले जात आहे, या सर्व किमती एक्स-शोरूम आहेत. क्लासिक 350 चे टॉप-एंड क्रोम व्हेरिएंट देखील त्याच 2.15 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) विकले जात आहे.

क्लासिक 350 2021 ची डिलिव्हरी सुरु

रॉयल एनफील्डने नुकत्याच लाँच झालेल्या 2021 क्लासिक 350 मोटरसायकलच्या पहिल्या बॅचची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही बाईक 1 सप्टेंबर रोजी भारतात लॉन्च करण्यात आली आहे ज्याची प्रारंभिक किंमत 1.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि 2.15 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) विक्री आहे. क्लासिक 350 हे भारतातील रॉयल एनफील्डचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. या बाईकची मागणी अशी आहे की भारतातील ब्रँडने विकलेली प्रत्येक दुसरी बाईक क्लासिक 350 आहे.

नवीन अपडेटसह, कंपनीला क्लासिकची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. न्यू-जेन क्लासिक 350 Meteor 350-सोर्स जे-प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. हे समान इंजिन, फ्रेम, सस्पेंशन आणि ब्रेक्स वापरते. याशिवाय, हे रॉयल एनफील्डच्या नवीन ट्रिपर टर्न बाय टर्न नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करते जे बाईकवर पर्यायी वैशिष्ट्य म्हणून उपलब्ध आहे.

इतर बातम्या

टाटाची नवी 10 लाख रुपयांची एसयूव्ही, जाणून घ्या काय आहे नाव आणि कधी होणार लाँच

निसान किक्स एसयूव्हीवर एक लाख रुपयांची सूट, विशेष लाभमध्ये 2 ग्रॅम सोन्याचे नाणे देखील देतेय कंपनी

टेस्लाचे ‘फुल सेल्फ-ड्रायव्हिंग’ सॉफ्टवेअर या महिन्यात लाँच होणार, एक वर्षापासून सुरू आहे चाचणी

(After Meteor 350, Royal Enfield hikes prices of Himalayan ADV in India)

शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....