कर्नाळा बँक अवसायकांची तडकाफडकी बदली, अवघ्या 9 दिवसात अवसायक बदलले

कर्नाळा बँक बुडित प्रकरणानंतर पनवेल आणि रायगडचे राजकारण ढवळून निघाले असतानाच गलिच्छ राजकारणाने थेट कर्नाळा बँकेत पुन्हा शिरकाव करण्यासाठी अवसायकांच्या बदलीचा घाट घालून सहकार खात्यामार्फत त्यांची तडकाफडकी बदली केली आली आहे. अवघ्या 9 दिवसात अवसायक बदलण्याचे सहकार आयुक्तांनी कुणाच्या दबावाखाली हत्यार उपसले याची चर्चा सुरु झाली आहे.

कर्नाळा बँक अवसायकांची तडकाफडकी बदली, अवघ्या 9 दिवसात अवसायक बदलले
Karnala Bank

नवी मुंबई : कर्नाळा बँक बुडित प्रकरणानंतर पनवेल आणि रायगडचे राजकारण ढवळून निघाले असतानाच गलिच्छ राजकारणाने थेट कर्नाळा बँकेत पुन्हा शिरकाव करण्यासाठी अवसायकांच्या बदलीचा घाट घालून सहकार खात्यामार्फत त्यांची तडकाफडकी बदली केली आली आहे. अवघ्या 9 दिवसात अवसायक बदलण्याचे सहकार आयुक्तांनी कुणाच्या दबावाखाली हत्यार उपसले याची चर्चा सुरु झाली आहे.

20 फेब्रुवारी 2020 पासून कर्नाळा बँकेवर जिल्ह्याचे उपनिबंधक जी. जी. मावळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 9 ऑगस्टला रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर 17 ऑगस्टला सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी मावळे यांच्या अवसायकपदाच्या नियुक्तीचे आदेश बजावले. त्यांनी पदभार स्वीकारला. दोनच दिवसांपूर्वी कवडे यांच्या आदेशाप्रमाणे डिपॉझिट इन्सुरन्स क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ई. संगीता यांनीही मावळे यांच्या नावाचे प्रतिज्ञापत्र घोषित केले.

असे असताना 26 ऑगस्टच्या एका आदेशानुसार मावळे यांच्याकडून सुत्रे काढून घेताना नव्या आदेशानुसार कवडे यांनी पनवेलचे सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांची नियुक्ती करुन कर्नाळा बँकेच्या ठेविदारांना मोठा धक्का दिला आहे. मावळे हे श्रेणी 1 चे अधिकारी असून – त्यांच्याकडून तडकाफडकी सुत्रे काढून घेताना आयुक्तांनी त्यांच्या जागी निम्नस्तरीय ब-श्रेणीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

या बदलीप्रकरणी पनवेल संघर्ष समितीचे कांतीलाल कडू यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकारचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मावळे यांची बदली रद्द करण्याचे साकडे घातले आहे. त्याशिवाय, त्यांनी संबंधितांसह आयुक्तांना पत्र पाठवून आंदोलनाचा इशाराही दिला. कर्नाळा बँक प्रकरणात ठेविदारांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले तेवढे थोडे झाले. आता त्यांच्या भावनांशी कुणी खेळण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नसल्याचा गंभीर इशारा पनवेल संघर्ष समितीचे कांतीलाल कडू यांनी लेखी स्वरुपात दिला आहे.

संबंधित बातम्या :

खारघर, तळोजा, कळंबोलीत पाणीटंचाई; सिडकोविरोधात लोकांचे आंदोलन

थकबाकीदारांनी कराची रक्कम 21 दिवसांच्या आत भरावी, अन्यथा मिळकतींची विक्री होणार, नवी मुंबई महापालिकेचे आदेश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI