नवी मुंबई महापालिकेची स्वच्छता मोहीम, कचराकुंड्या हटवून वृक्ष सुशोभिकरण

| Updated on: Aug 26, 2021 | 1:20 PM

नवी मुंबई महापालिकेने कोरोना विषाणुला रोखण्याबरोबरच शहर स्वच्छतेकडे लक्ष पूर्ण लक्ष दिले आहे. नवी मुंबई महापालिकेने कचरामुक्त शहराची घोषणा करीत कचराकुंड्या काढून टाकल्या आहेत. मात्र, त्या जागेवर आजही कचरा टाकला जात आहे. महापालिका प्रशासनाने जागा स्वच्छ करत त्या ठिकाणी वृक्ष सुशोभिकरण केलं आहे. तसेच देखरेखीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.

नवी मुंबई महापालिकेची स्वच्छता मोहीम, कचराकुंड्या हटवून वृक्ष सुशोभिकरण
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने कोरोना विषाणुला रोखण्याबरोबरच शहर स्वच्छतेकडे लक्ष पूर्ण लक्ष दिले आहे. नवी मुंबई महापालिकेने कचरामुक्त शहराची घोषणा करीत कचराकुंड्या काढून टाकल्या आहेत. मात्र, त्या जागेवर आजही कचरा टाकला जात आहे. महापालिका प्रशासनाने जागा स्वच्छ करत त्या ठिकाणी वृक्ष सुशोभिकरण केलं आहे. तसेच देखरेखीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.

शहरात ठिकठिकाणी कचरा टाकला जातो. महापालिका विविध उपाययोजना करुन सुद्धा कचरा टाकणे बंद होत नव्हते. त्यामुळे पालिकेने त्या जागी आता झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. शिवाय ही जागा पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आली असून स्वच्छता कर्मचारी देखरेखीसाठी ठेवण्यात आला आहे.

आता तरी नागरिक या ठिकाणी कचरा टाकणार नाहीत अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने दुकानदाराच्या मदतीने त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा लावला आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकू नये. नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यात मदत करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे.

नवी मुंबईला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ओडीएफ कॅटेगरीतील सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये ओडीएफ कॅटेगरीमध्ये ओडीएफ डबल प्लसच्या पुढील सर्वोच्च “वॉटरप्लस मानांकन” नवी मुंबई महानगरपालिकेस जाहीर झाले असून वॉटरप्लस मानांकन संपादन करणारे “नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर” आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये देशातील तृतीय आणि महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ ला सामेर जाताना “निश्चय केला – नंबर पहिला” हे ध्येय निश्चित करुन नवी मुंबईकर नागरिकांच्या सहयोगाने महानगरपालिका सर्वेक्षणाला सामोरी गेली आहे. यामध्ये हागणदारीमुक्त शहरांच्या (ओडीएफ सिटी) श्रेणीमध्ये सर्वोच्च असणारे “वॉटरप्लस” हे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारमार्फत जाहीर झाले असून सर्वोच्च ‘वॉटरप्लस मानांकन’ मिळविणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव व देशातील 4 शहरांमधील एक शहर आहे.

संबंधित बातम्या :

सिडकोतर्फे विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात, पात्र अर्जदारांना सिडकोचा दिलासा

नवी मुंबई शहरात लसींचा तुटवडा; तिसऱ्या लाटेचे संकट कायम, महापालिका हतबल