नवी मुंबई शहरात लसींचा तुटवडा; तिसऱ्या लाटेचे संकट कायम, महापालिका हतबल

शहरात डेल्टा रुग्ण सापडला असून शहरावर तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. त्यामुळे अधिकाधिक लसीकरण करून नागरिकांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. शिवाय सध्याची रुग्णसंख्या आटोक्यात राहावी म्हणून अधिक धोका असलेल्या नागरिकांना दोन्ही डोस देण्याचा प्रयत्न पालिका करत आहेत.

नवी मुंबई शहरात लसींचा तुटवडा; तिसऱ्या लाटेचे संकट कायम, महापालिका हतबल
विशेष लसीकरण सत्राचा 98 दिव्यांगांनी घेतला लाभ
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 9:43 PM

नवी मुंबई : कोरोना विरोधात नवी मुंबई महापालिका आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवत आहेत. टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यापासून महापालिका विविध उपाययोजनांबाबत कामाला लागली आहे. मात्र, शहराला मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा असून पालिकेची यंत्रणा अशीच पडून आहे. त्यामुळे नागरिकांचे लसीकरण करून तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी पालिका हतबल झाल्याचे दिसत आहे. (Vaccine shortage in Navi Mumbai; the Municipal Corporation is helpless)

आठवड्या पंधरा दिवसातून पालिकेला लसींचा पुरेसा साठा उपल्बध होतो. त्यात सुद्धा पालिका एकाच दिवसात योग्य नियोजन करून अधिकाधिक लोकांना डोस देऊन सुरक्षित करते. त्यामुळे शहरातील 11 लाख लसीस पात्र नागरिकांपैकी 2 लाख 94 हजार 142 जणांना दोन्ही तर 7 लाख 94 हजार 572 जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.

शहरात 100 लसीकरण केंद्र

शहरात महापालिकेने जवळपास 100 लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. लसीच्या पुरवठ्यानुसार योग्य त्या ठिकाणी अपेक्षित डोस पुरवण्यात येतात. शिवाय सर्वच घटकातील लोकांचे लसीकरण व्हावे याकरीता नियोजन कार्यक्रम राबवण्यात येतात. मात्र, निशुल्क लस पुरवठा कमी असल्याने गरीब आणि गरजू घटकांचा धोका कायम आहे. तर खासगी केंद्रांवर मात्र मोठ्या प्रमाणात 250 ते 1200 रुपये घेऊन लसीकरण सुरू आहे. सुरुवातीच्या काळात महापालिकेने मोठ्या प्रमाणात लसीकरण केले होते. मात्र लस तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणात खंड पडत आहे.

शहरावर तिसऱ्या लाटेचे संकट कायम

शहरात डेल्टा रुग्ण सापडला असून शहरावर तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. त्यामुळे अधिकाधिक लसीकरण करून नागरिकांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. शिवाय सध्याची रुग्णसंख्या आटोक्यात राहावी म्हणून अधिक धोका असलेल्या नागरिकांना दोन्ही डोस देण्याचा प्रयत्न पालिका करत आहेत.

पालिका जशी लस उपलब्ध होईल तसे नियोजन करत असली तरी कधी पहिला आणि दुसरा डोस तर कधी फक्त दुसरा डोस त्यामुळे आपल्याला नक्की लस कधी मिळेल हि शाश्वती नागरिकांना नाही. सध्या दोन डोस घेलेल्या लोकांना रेल्वे प्रवास सुरु केल्याने अनेक बेरोजगार लोकांच्या नोकरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तरुणाईला पहिलाच डोस मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Vaccine shortage in Navi Mumbai; the Municipal Corporation is helpless)

इतर बातम्या

संजय राऊत संपादक पदासाठी लायक नाहीत, राणेंचा घणाघात; ‘संभल जाओ, सुधर जाओ’, राऊतांचं प्रत्युत्तर

नारायण राणेंच्या अटकेप्रकरणी पाठराखण, गृहराज्यमंत्री म्हणतात ‘पोलिसांनी जबाबदारी योग्य रितीने पार पाडली’

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.