एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटला! शिवसैनिक रस्त्यावर उतरले, नवी मुंबईत जाळपोळ तर नागपुरमध्येही… 

| Updated on: Jun 25, 2022 | 5:34 PM

खारघर येथे शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि रायगड मधील तीन आमदारांचे पुतळे जाळले. भरत गोगावले, महेंद्र दळवी , महेंद्र थोरवे यांचे पुतळे शिवसैनिकांनी जाळले आहेत. या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी शिंदे गटा विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटला! शिवसैनिक रस्त्यावर उतरले, नवी मुंबईत जाळपोळ तर नागपुरमध्येही... 
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे (chief minister uddhav thackeray) संघर्ष चांगलाच पेटला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. नवी मुंबईत(Navi Mumbai) जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला आहे.  खारघर येथे शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. एकनाथ शिंदेसह त्यांच्यासह गेलेल्या बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

एकनाथ शिंदेसह आमदारांचे पुतळे जाळले

शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि रायगड मधील तीन आमदारांचे पुतळे जाळले. भरत गोगावले, महेंद्र दळवी , महेंद्र थोरवे यांचे पुतळे शिवसैनिकांनी जाळले आहेत. या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी शिंदे गटा विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

नागपुरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थानात लावण्यात आलेलं होर्डिंग फाडल

नागपुरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थानात  होर्डिंग लावण्यात आले. शिवसेनेचे झेंडे घेऊन काही कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी हे होर्डिंग फाडल.

सावंत समर्थकांकडून कार्यालयाचे शुद्धीकरण

उस्मानावाद येथे शिवसेनेत 2 गट पडले आहेत. शिवसैनिकांनी आमदार सावंत यांच्या संपर्क कार्यालयावर हल्लाबोल करीत काळे फसल्यानंतर सावंत समर्थकांचा गट आक्रमक झाला. शिवसैनिकांच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून सावंत समर्थकांनी सावंत यांच्या उस्मानाबाद संपर्क कार्यालयाचे शुद्धीकरण करीत खेकडा सावंत गद्दार असे काळे लिहलेले खोडून काढले आहे.

आमदार सुहास कांदे यांच्या नाशिक येथील कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आमदार सुहास कांदे यांच्या नाशिक येथील कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच सुहास कांदे सामर्थना दिल्या घोषणा देखील दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्याता आला आहे. राज्यातल्या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत

मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये काही अपवादात्मक बाबींना सूट आहे. मात्र लाऊडस्पीकर वैगेरे इत्यादी बाबींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. आमदार खासदार आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवला आहे. राजकीय बॅनरबाजी होणार नाही, याकडेही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आंदोलन किंवा हिंसा होणार यांची याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.