AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत म्हणजे शेवटचा फडफडणारा दिवा, उद्धव ठाकरेंनी…; भाजपची जहरी टीका

भाजप नेते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर शेवटचा फडफडणारा दिवा म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जींच्या घराबाहेर आंदोलन करावे आणि काँग्रेसच्या 'अजगर' प्रवृत्तीपासून सावध राहावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

संजय राऊत म्हणजे शेवटचा फडफडणारा दिवा, उद्धव ठाकरेंनी...; भाजपची जहरी टीका
sanjay raut uddhav thackeray
| Updated on: May 06, 2026 | 12:26 PM
Share

भाजपचा विजय झाल्यावर राऊत असं म्हणाले की दिवा विझताना मोठा होतो, पण संजय राऊत तुम्हीच शेवटचे फडफडणारे दिवे आहात. तुमचं अस्तित्व संपवायचं, मशाल विझवायची आणि मगच दिवा विझणार हे सुपारी घेऊन राऊतांनी सांगितलं आहे, अशी टीका भाजपचे नगरसेवक आणि नेते नवनाथ बन यांनी केली. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला.

तुम्ही ठाकरेंचा शेवटचा दिवा विझवून शांत होणार?

सूर्य कधीच अस्ताला जात नसतो. भाजप लोकांची सेवा करते, जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद आहेत, तोपर्यंत आमचा पराभव होणार नाही. मात्र, तुम्ही काय उबाठाचा शेवटचा दिवा विझवून शांत होणार? भाजप जनतेच्या जीवावर निवडून येते, तुमच्यासारखं घरात बसण्याचे काम करत नाही, ती भाजपची परंपरा नाही. संजय राऊतांनी नशीब जागतिक महायुद्धासोबत किंवा जपानच्या अणुबॉम्बसोबत तुलना केली नाही हे बरं झालं. अशा शब्दात नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर ताशेरे ओढले.

राजीनामा दिला काय किंवा नाही, त्याला फरक पडत नाही

यावेळी नवनाथ बन यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर भाष्य केले. एखाद्याला नोकरीवरून काढल्यानंतर राजीनामा देण्यात अर्थ नसतो. ममता यांनी राजीनामा दिला काय किंवा नाही त्याला काही फरक पडत नाही, कारण त्यांनी जनमताचा सन्मान कधीच केला नाही. बंगालमध्ये त्यांनी केवळ दादागिरी केली आणि त्यांचेच समर्थन राऊत करत आहेत. उद्धव ठाकरेंनी आता मातोश्री सोडत ममतांच्या घराबाहेर बसून वर्षभराचे आंदोलन करावे. विधान परिषदेचा राजीनामा त्यांनी दिला नाही आणि विधानसभा निवडणुकीत सुवेंद्रु अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही नवनाथ बन म्हणाले.

काँग्रेसने डीएमकेला तोंडावर पाडलं

काँग्रेस हा अजगर आहे, जो आपल्या सहकाऱ्यांना गिळंकृत करतो. खासदारकीची चिंता संजय राऊतांना आहे, म्हणून ते अजगराला जवळ करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये इंडी आघाडी नव्हतीच, ती मंच नसलेली आघाडी होती. तिथे ममता बॅनर्जी एकट्या लढल्या आणि काँग्रेसला एक जागाही आली नाही. इकडे तुम्हाला सीट शेअरिंग जमलं नाही आणि कसल्या गप्पा मारत आहात? टीव्हीकेला मदत करून काँग्रेसने डीएमकेला तोंडावर पाडलं आहे, असेही नवनाथ बन यांनी सांगितले.

आधी तुमचे आमदार आणि खासदार सांभाळा

संजय राऊतांना आठवण करून द्या की, संजय दीना पाटील यांच्या घरातील व्यक्ती रुग्णालयात होते तेव्हा एकनाथ शिंदे त्यांना भेटून येतात. तुम्हाला लक्षात आलं नसेल, आधी तुमचे आमदार आणि खासदार सांभाळा. राजकीय बळी देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दानवे यांना संधी दिली. काँग्रेसकडे कसं पाया पडावं लागलं, राहुल गांधींना कसे फोन करावे लागले यावरही दानवे यांनी बॅनर्स लावले पाहिजेत, असे नवनाथ बन यांनी म्हटले.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा