पुण्यातील मोठा उद्योगपती बिझनेस ट्रीप सांगून गर्लफ्रेंडसोबत निघाला मलेशियाला, पण ऐनवेळी बायकोला समजलं अन्..
पुण्यातील एका उद्योगपतीचे बिंग खतरनाक पद्धतीने फुटले. मलेशियात आपल्या गर्लफ्रेंडसोबत फिरण्यासाठी उद्योगपती निघाला. मात्र, मुंबई विमानतळावर हे घडले, त्याचा विचारही त्यांनी केला नव्हता. पत्नी थेट पोलिसात ठाण्यात पोहोचली आणि पुढे जे घडले ते धक्कादायक होते.

बायकोला आणि घरच्यांना मलेशिया बिझनेस ट्रिपला जातोय, म्हणून सांगणाऱ्या एका बड्या उद्योगपतीचे बिंग फुटले. थेट विमानतळावरच मोठा राडा झाला. पुण्यातील हा उद्योगपती आहे. बायको आणि कुटुंबियांना बिझनेस ट्रिपला जातो, म्हणून विदेशात गर्लफ्रेंडसोबत फिरण्यासाठी उद्योगपती निघाला. मात्र, ज्याचा विचार केला नाही तेच मुंबई विमानतळावर घडले. मलेशियातील कुआला लंपूर येथे उद्योगपती निघाला. पु्ण्यातील मोठा लाँड्री व्यावसायिक वय 46 आपल्या गर्लफेंडसोबत मलेशियाला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचला. विमानतळावर इमिग्रेशन चेकिंग सुरू झाले. यादरम्यान या गर्लफ्रेंडला तेथील कर्मचाऱ्यांनी पासपोर्ट पाहून रोखले. तिचा पासपोर्ट जुना होता. माझा अगोदरचा पासपोर्ट हरवला असून याबाबतची तक्रार पोलिसात दाखल अगोदरच करण्यात आली, असा या महिलेने दावा केला. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, तुम्हाला या पासपोर्टवर प्रवास करता येणार नाही.
यासोबतच कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले. कायदेशीर कारवाईत अडकण्याची भीती या उद्योजकाला वाटली. त्यानंतर सर्व गोष्टी टाळण्यासाठी व्यावसायिकाने थेट आपला मलेशियाला जाण्याचा निर्णयच रद्द केला. आता मलेशियाला जाणे रद्द झाले बायकोला समजले तर काही होईल, या भीतीने व्यावसायिकाने मोठा कट रचला. त्याने सर्वात अगोदर आपला फोन बंद केला.
यादरम्यान त्याने विमानतळावरील एका फोनवरून बायकोला फोन केला आणि इमिग्रेशनच्या समस्येमुळे मी माझ्या फोन जमा केला जात असल्याचे उद्योगपतीने आपल्या पत्नीला सांगितले. त्यानंतर तो गर्लफ्रेंडसोबत थेट सीएसटी रेल्वेस्थानकावर पोहोचला. दुसऱ्या दिवशी त्याने काही सेकंदासाठी बायकोला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्याचा फोन पुन्हा बंद झाला. आपला नवरा कोणत्या अडचणीत सापडला नाही ना…
याकरिता बायको वारंवार फोन करत होती. मात्र, नवऱ्याचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. आपल्या पतीचे कोणी अपहरण तर केले नाही ना या भीतीने बायकोने थेट पोलिस ठाणे गाठले आणि अपहरणाची तक्रार दाखल केली. बायकोने एफआयआर दाखल केल्याची माहिती मिळताच उद्योगपतीने सहार पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याची चाैकशी केली असता त्याने मान्य केले की, गर्लफ्रेंडसोबतचा विदेश दाैरा लपवण्यासाठी आपण हे सर्व केले.
