राज्यात 2 महिन्यात 33 हजार 799 बेरोजगारांना रोजगार, तुम्हाला नोकरी हवीय? इथं अर्ज करा

| Updated on: Mar 13, 2021 | 12:54 AM

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमधून राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये 33 हजार 799 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला.

राज्यात 2 महिन्यात 33 हजार 799 बेरोजगारांना रोजगार, तुम्हाला नोकरी हवीय? इथं अर्ज करा
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. असं असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमधून राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये 33 हजार 799 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली (Nawab Malik announce that government provide 33 thousand 799 jobs in two months in Maharashtra).

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. यासाठी राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था यांची सांगड घालण्यात येते. मागील वर्षी 2020 मध्ये अशा विविध उपक्रमांमधून राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आलं. या जानेवारी महिन्यात 20 हजार 713 बेरोजगारांना तर फेब्रुवारी महिन्यात 13 हजार 86 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला, असंही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

राज्यातील बेरोजगार तरुणांनी कुठे अर्ज करावा?

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केलं आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवारांनी आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात.

सरकारची भूमिका काय?

अशा प्रकारे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते. त्याचबरोबर विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. राज्यात या विविध उपक्रमांना बेरोजगार उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत.

नोकरीइच्छूक तरुणांकडून कोणती माहिती अपेक्षित?

“रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठीचे हे उपक्रम यापुढील काळातही प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. यासाठी नोकरीइच्छूक तरुणांनी महास्वयंम वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी, आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही वेबपोर्टलवर नोंदणी करावी,” असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केलं.

हेही वाचा :

‘या’ एनआयटीमध्ये शैक्षणिक पदांसाठी भरती, पगार लाखोंच्या घरात

Women’s Day 2021: फक्त महिला अधिकाऱ्यांनाच मिळणार नोकरी, ‘या’ कंपनीची मोठी घोषणा

भूमिपुत्रांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण, विधेयक मंजूर; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ पाहा :