‘सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच!’, मलिकांच्या विधानामागील भाजपचे ‘ते’ नवाब कोण?

| Updated on: Feb 02, 2022 | 6:29 PM

नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केल्याने, भाजपमधील हे मद्यपी कोण? असा सवाल सर्वांसमोर उपस्थित झाला आहे.

सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच!, मलिकांच्या विधानामागील भाजपचे ते नवाब कोण?
भाजपमध्ये सर्वात जास्त पिणारे-मलिक
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या वाईवरून (Wine In Maharashtra) जोरदार पॉलिटिकल राडा सुरू आहे. गेल्या कॅबिनेटमध्ये सरकारने मोठा निर्णय घेत वाईन दुकानात आणि सुपरमार्केटमध्ये (Wine In supermarket) विकण्यास परवानगी देण्याची घोषणा केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी (Mahavika Aghadi) सरकारला जोरदार घेरलं. फक्त भाजपच नाही तर इतर अनेक घटकांमधून या निर्णयाला विरोध करण्यात आला. आता राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केल्याने, भाजपमधील हे मद्यपी कोण? असा सवाल सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये जो वाईन पॉलिसीचा निर्णय सरकारने घेतला होता, त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. जे भाजप आज सांगत आहे की बेवड्यांचं राज्य होईल, त्याच भाजपात सर्वात जास्त नेते दारू पितात. भाजप नेत्यांचे दारूचे कारखाने आहेत. भाजपच्या नेत्यांचे वाईन शॉप्स आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे आणि माजी मंत्र्यांचे बार आहेत. त्यामुळे वाईनला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी हे सर्व परवाने परत करावे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे की दारू पिणार नाही, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी लावला आहे.

भाजप खासदाराचं थोडी थोडी पिया करो

तसेच भाजपचे खासदार सांगत आहेत की थोडी थोडी पिया करो, असे म्हणत भाजपला खासदार प्रज्ञा साध्वींच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. दारू थोड्या प्रमाणात पिल्यास ती औषधाचे काम करते असे वक्तव्य साध्वींनी केलं होतं. तसेच मध्य प्रदेश हा मध्यप्रदेश राहिलेला नसून तो मद्यप्रदेश झालेला आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. तिथे होम बारची परवानगी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. या राज्यातल्या विरोधी पक्षनेत्यांनी जाऊन शेजारच्या राज्यातील मामाजींना भेटून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि त्यावर भाष्य करावे असा सल्ला त्यांनी फडणवीसांना दिला आहे.

अनिल देशमुखांबाबत काय म्हणाले?

अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब का ठेवला गेला हे एएनआयएने सांगवे, सर्व माहिती लपवण्याचे काम सुरू आहे. राजकीय षडयंत्रामुळे हे सर्व होत आहे, अनिल देशमुखांच्या जामीनावर ब्रेक लागावा यासाठी एजन्सी आणि परमबीर सिंह असे प्रयत्न करत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच नितेश राणेंवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाने नितेश राणे यांना अटक झाली आहे. देशात भाजपकडून जशी दडपशाही सुरू आहे, असा कुठलाही प्रकार राज्य शासन करत नाही, हे सर्व नियमाने सुरू आहे. अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

Nitesh Rane arrest : भाजप आमदार नितेश राणेंना अखेर 2 दिवसांची पोलीस कोठडी! दिवसभरात नेमकं काय घडलं?

Nitesh Rane Arrest : नितेश राणेंना मोठा झटका, 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी! सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निकाल

Nanded Politics | अर्धापूरात नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची चढाओढ, आता निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाणांच्या हाती!