Nanded Politics | अर्धापूरात नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची चढाओढ, आता निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाणांच्या हाती!

अर्धापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. 17 पैकी 10 जागांवर काँग्रेसने सत्ता संपादन केली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे अर्धापुरात प्रथमच कमळ फुलल्याची जोरदार चर्चा आहे.

Nanded Politics | अर्धापूरात नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची चढाओढ, आता निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाणांच्या हाती!
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:11 PM

नांदेड: मराठवाड्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमधील अर्धापूरची नगरपंचायत (Ardhapur Nagar Panchayat) निवडणूक नुकतीच पार पडली. पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच मतदार संघातील अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला तिसऱ्यांदा बहुतमत मिळाले. आता नगराध्यक्षपद कुणाकडे जाणार, यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. 1 फेब्रुवारी रोजी अर्धापूर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची (Nanded Congress) बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी अध्यक्षपदासाठी निवेदन दिले. त्यामुळे या बैठकीत अध्यक्षपदी कोण बसणार, हा प्रश्न सुटला नाही. आता या जागेचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण घेतील, असा निर्णय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतला.

अर्धापुरात काँग्रेसची सत्ता, प्रथमच कमळही फुललं

अर्धापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. 17 पैकी 10 जागांवर काँग्रेसने सत्ता संपादन केली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे अर्धापुरात प्रथमच कमळ फुलल्याची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीत एमआयएमचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे एक जागा मिळवली. काँग्रेसचा एक बंडखोर नगरसेवकदेखील विजयी झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते नासेर खान पठाण, पप्पु बेग यांचा व भाजपचे नेते धर्मराज देशमुख यांच्या पत्नी मिनाक्षी देशमुख, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांचा धक्कादायक पराभव चर्चेचा विषय ठरला.

नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या बैठकीत आमदार अमरनाथ राजूरकर, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, काँग्रेस शहराध्यक्ष राजेश्वर शेट्टे, तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी नगरपंचायतमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे 10 नगरसेवक आणि 1 बंडखोर नगरसेवक या सर्वांनीच अध्यक्षपदासाठी निवेदन दिले. त्यामुळे आता बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडलेला उमेदवारच अध्यक्षपदावर बसेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आता नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

Noida IT Raid: माजी आयपीएसच्या बंगल्यातील तळघरात 700 लॉकर्स, 5.77 कोटींची रक्कम जप्त

Nanded महापालिका निवडणुकीच्या हालचाली, यंदा प्रथमच आरक्षणाशिवाय प्रभाग रचना, किती नगरसेवक वाढणार?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.