BJP नेत्यांचे बिंग फोडणारी CD मलिकांकडे म्हणून अटक! जुन्या भाषणाच्या Videoने खळबळ

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. आता एक जुना व्हिडिओ समोर आला आहे ज्याने खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांच्या मुलीने हा व्हिडिओ ट्विट (Viral Video) केला आहे.

BJP नेत्यांचे बिंग फोडणारी CD मलिकांकडे म्हणून अटक! जुन्या भाषणाच्या Videoने खळबळ
नवा मलिक यांचा जुना व्हिडिओ ट्विट
Image Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 9:22 PM

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik) यांच्यावरून गदारोळ सुरू आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. आता एक जुना व्हिडिओ समोर आला आहे ज्याने खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांच्या मुलीने हा व्हिडिओ ट्विट (Viral Video) केला आहे. ज्यात नवाब मलिक भाषण करताना भाजप नेत्यांचे बिंग फोडण्याची भाषा करत आहेत. माझ्या जवळ असलेला हायड्रोन बॉम्ब फोडल्यावर, माझ्याकडील सीडी बाहेर काढल्यावर भाजप नेत्यांची अवस्था बिकट होईल, असे मलिक बोलत आहेत. भाजप (Bjp Leaders underworld connection) नेत्यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, याची माहिती माझ्याकडे आहे, असेही मलिक या व्हिडिओत सांगत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.

जुन्या व्हिडिओने खळबळ


अमोल मिटकरी यांचेही आरोप, भातखळकरांचं उत्तर

भाजप नेत्यांची हीच माहिती बाहेर येईल या भितीने मलिकांना अटक करण्यात आली आहे, असा आरोप आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. तर खोटी वटवट बंद करा असे भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले आहेत, त्यांनी हे आरोपही फेटाळून लावले आहेत. 2 डिसेंबर 2021 चे नवाब मलिक यांचं भाषण होत आणि तेव्हापासून भाजप मध्ये अस्वस्थता होती, भाजपच्या कोणत्या नेत्यांचे दाऊदशी संबध आहेत हे मी महाराष्ट्राच्या समोर आणणार, असे मलिक म्हणाले होते. त्यामुळे कटकारस्थान रचून मलिक यांना अडकवण्यात आले. ते हायड्रोजन बाँम्ब टाकणार होते. नवाब मलिकांकडे सर्व पुरावे आहेत, असा दावा आता अमोल मिटकरी यांनी केलाय. तसेच भाजपने केद्रींय यंत्रणाचा वापर करुन त्यांना आत टाकलं आहे, मलिकांच्या कन्येनी सुद्धा तो व्हिडिओ ट्विट केला आहे, असेही मिटकरी म्हणाले आहेत.

भाजपचे पुन्ही गंभीर आरोप

तर दुसरीकडे भाजप नेते नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्यावरून आरोप करत आहे. मुस्लिमांना खूश करण्यासाठी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात येत नाहीये, असा आरोप आता भाजप नेत्यांकडून होतोय. चंद्रकांत पाटील यांनी दुपारीच याबाबत भाष्य केलंय. हा जो अट्टहास आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसेच मग अनिल देशमुख आणि राठोड यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही त्यांनी केला आहे. विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राजीनामा होत नाही, असा थेट आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Sharad Pawar यांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, रावसाहेब दानवे यांचं टीकास्त्र

विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा नाही, मलिकांच्या राजीनाम्याला पुन्हा धार्मिक रंग

आमचा रंग ओरिजनल , दाऊदच्या माणसाला साथ देणाऱ्या शिवसेनेचा रंग फिका, रावसाहेब दानवेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर