मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; भाजप, अजितदादा गटाची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे, आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत असून, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि अजितदादा गटानं मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; भाजप, अजितदादा गटाची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
महायुती
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 13, 2025 | 9:18 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान यावेळी परिस्थिती वेगळी आहे, म्हणजे सर्वच ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जात नसून, अनेक ठिकाणी पक्षांनी स्थानिक पातळीवर आपआपल्या सोईनुसार युती, आघाडी केल्याचं पहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं युती केली आहे. दरम्यान आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

रायगड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचं देखील या जिल्ह्यावर चांगलं वर्चस्व आहे. पालकमंत्रिपदावरून देखील हा जिल्हा चांगलाच चर्चेत आला होता, रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना देण्यात आल्यानं भरत गोगावले चांगलेच नाराज झाले होते, अजूनही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाहीये, त्यातच आता रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाला भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोठा धक्का दिला आहे.

रायगड जिल्ह्यातील पहिली भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युती महाड नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर झाली असून, महायुतीत फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत. संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. नगराध्यक्ष पदासह 16 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर 5 जागांवर भारतीय जनता पक्ष उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून,  महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप विरुद्ध शिवसेना अशी त्रीकोनी लढत रंगणार आहे. या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप, भाजप जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हमुनकर यांची देखील उपस्थिती होती. हा रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.