राजकारणात मोठा भूकंप; सत्ता गमावली, शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून भाजपचा मोठा गेम

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटानं आणि शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे. राजकारणात मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.

राजकारणात मोठा भूकंप; सत्ता गमावली, शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून भाजपचा मोठा गेम
भाजपला धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 12, 2026 | 5:05 PM

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.  प्रचाराला रंगत आली असून, आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट देखील या युतीमध्ये सहभागी आहे. दरम्यान जिथे -जिथे अजित पवार गटाची भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होऊ शकली नाही, तिथे काही ठिकाणी अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे.

अंबरनाथ  नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीचा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीचा विजय झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार सदाशिवमामा पाटील यांनी बाजी मारली आहे.  भाजप प्रणित उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे आता भाजपच्या हातातून सत्ता गेली आहे. दरम्यान शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर  अंबरनाथ नगरपालिकेत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं.  भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कोणाकडे किती संख्याबळ? 

अंबरनाथ नगर परिषदेमधील एकूण नगरसेवकांची संख्या 59 एवढी आहे. या नगरपालिकेमध्ये भाजपचे 14 नगरसेवक होते, त्यातच काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं ही संख्या 26 झाली, एक अपक्ष नगरसेवक आणि चार राष्ट्रवादीचे नगरसेवक मिळून हा आकडा 31 वर पोहोचला होता, तसेच निवडणुकीच्या आदल्यादिवशीच या सर्व नगरसेवकांना व्हीप देखील बजावण्यात आला होता. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी पाठिंबा दिला, त्यामुळे इथे शिवसेनेचा विजय झाला. शिवसेनेकडे या नगर परिषदेमध्ये एकूण 27 नगरसेवक आहेत, हे 27 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 असे मिळून शिवसेना शिंदे गटाचे 31 नगरसेवक झाले.  या निवडणुकीत शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीचे सदामामा पाटील यांना 32 मतं पडले तर  भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीच्या प्रदीप पाटील यांना 28 मतं पडली.