‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारले

आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करत आहोत. त्यामुळे 'अ'ची 'ब'ला आणि 'ब'ची 'क'ला लावालावी करू नका; अशा शब्दात जयंत पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे. (ncp leader jayant patil slams bjp over maharashtra politics)

'अ'ची 'ब'ला आणि 'ब'ची 'क'ला लावालावी करू नका; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारले
जयंत पाटील
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 6:56 PM

अमरावती: राज्यातील आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आमचा कारभार उत्तम सुरू आहे. आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करत आहोत. त्यामुळे ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका; अशा शब्दात जयंत पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे. (ncp leader jayant patil slams bjp over maharashtra politics)

जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने अमरावतीत आले आहेत. आज संध्याकाळी राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडल्याने त्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी विरोधकांना फटाकरले आहे. ‘महाविकास आघाडी सरकारमधील आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने राज्यकारभार करत आहोत. ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावलावी करणाऱ्यांनी हे उद्योग सोडावेत’, अशा शब्दात पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे.

शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा डाव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वारंवार दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर गेले होते. आज देशातील सर्व शेतकऱ्यांची सहानुभूती दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. मात्र हे आंदोलन बदनाम करण्याचं काम आज भाजप करत आहे. तसं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे घडलं ते पुढे करून शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचं जनमत केलं जात आहे. आंदोलनांना बदनाम करण्याची भाजपची ही जुनीच खेळी आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

पटोलेंचा राजीनामा

दरम्यान, नाना पटोले आज (4 फेब्रुवारी) रोजी दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.

कोणतं खातं मिळणार?

पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, ज्या काँग्रेस नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, त्याचं आताचं खातं पटोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे सरकारमधील काँग्रेसच्या विद्यमान मंत्र्यालाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्याकडील आताचं खातं पटोले यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यामुळे मंत्रिपदाबाबतची खळखळ होणार नाही, अशा प्रकारची काँग्रेसची रणनीती असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.

नवा विधानसभा अध्यक्ष कोण?

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा अध्यक्ष, काँग्रेसचाच होणार की शिवसेनेचा? याबाबतही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आघाडीत उलथापालथ?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. राज्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष बदलण्यासाठी हायकमांड आग्रही असल्याचे कळते. विद्यमान पाच कार्याध्यक्षांसह कार्याध्यक्षपदात वाढ करण्याची पक्षश्रेष्ठींची रणनीती आहे. संघटनात्मक बदल करताना मंत्र्यांऐवजी पूर्णवेळ पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा कल असल्याचे समजते. (ncp leader jayant patil slams bjp over maharashtra politics)

संबंधित बातम्या:

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

पवारांचे फक्त तीन वाक्य आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर

Nana Patole | भाजपात असताना मोदींशी लढले आता थेट काँग्रेसच्या राज्यातल्या सर्वोच्चपदी, कोण आहेत लढवय्ये नाना?

(ncp leader jayant patil slams bjp over maharashtra politics)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.