AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : निवडणुकांदरम्यान जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी

देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या जात असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ला झालेल्या भागात काही दिवसांत मतदान होणार आहे. भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या या भागात पाठवण्यात आल्या आहेत. भारतीय हवाई दलानेही याबाबत माहिती दिली आहे.

मोठी बातमी : निवडणुकांदरम्यान जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी
jammu & kashmir firing on air force
| Updated on: May 04, 2024 | 10:50 PM
Share

देशात लोकसभा निवडणुका पार पडत असताना जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर गोळीबार झाला आहे. या हल्लामध्ये पाच जवान जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून एका जवानाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजत आहे.  घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे विशेष दल गरुड तैनात करण्यात आलं आहे. भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या या भागात पाठवण्यात आल्या आहेत. भारतीय हवाई दलानेही याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या स्थानिक तुकडीने परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. हवाई दलाची वाहने शाहसीतारजवळील एअरबेसच्या आत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली.  हा दहशतवादी हल्ला पूंछ जिल्ह्यातील सुनारकोटच्या सेनाई गावात झाला. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिलं. 2024 मधील या भागातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

दरम्यान, भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान प्रक्रिया सुरू असताना हा दहशतवादी हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारण ज्या भागात हा हल्ला झाला, अनंतनाग-राजौरी-पुंछ या मतदारसंघात येत्या 25 मे ला मतदान होणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.