Narhari Zirval: ‘… तर पद सोडेन, जिवाचीही पर्वा करणार नाही’, नरहरी झिरवळांनी कुणाला दिला शब्द?

समाजावर कुठल्याही प्रकारची आपत्ती येणार असेल तर आमच्या जिवाचे सोडून द्या. जिव सर्वांना प्यारा असतो. मात्र आम्ही जिवाचीही पर्वा करणार नाही, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांचे नाव घेत महत्त्वाचे विधान केले.

Narhari Zirval: ... तर पद सोडेन, जिवाचीही पर्वा करणार नाही, नरहरी झिरवळांनी कुणाला दिला शब्द?
| Updated on: Nov 21, 2026 | 9:14 PM

Narhari Zirval: ‘ आम्हाला काही गोष्टी उघडपणे बोलता येत नाहीत, मात्र तुमच्यावर काही संकट आले तर मंत्रिपदच नाही तर जीवही देणार असं सर्वात मोठे अन् महत्त्वाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील जलधारा गावात भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होते, यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले नरहरी झिरवळ?

Loading...

“बऱ्याचवेळा लोक असे सांगतात की एमपीएससी किंवा बाहेरच्या देशात शिक्षणासाठी 15 च आदिवासी जाऊ शकतात, फक्त 15 आदिवासींनाच हे शिक्षण दिले जाऊ शकते. पण फक्त 15 नाही नगण्यसुद्धा आपण पाठवू. पण तेवढी तयारी तुम्ही केली पाहिजे. मुलांनी तेवढं मेरिट निर्माण केले पाहिजे, तयार केले पाहिजे. तर आपण निश्चितच परदेशी शिक्षणाची संख्या अमर्याद करु शकतो. कारण आपला आदिवासी विकास विभागाला कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. त्या विभागाचा मंत्री म्हणजेच मुख्यमंत्री,” असं नरहरी झिरवळ म्हणाले.

समाजासाठी जिवही देणार! 

तसेच “एकच शब्द देतो. जे काही समाजावर कुठल्याही प्रकारची आपत्ती येणार असेल तर आमच्या जिवाचे सोडून द्या. जिव सर्वांना प्यारा असतो. मात्र आम्ही जिवाचीही पर्वा करणार नाही, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांचे नाव घेत महत्त्वाचे विधान केले.

नरहरी झिरवाळ म्हणाले की, माझ्या बाबतीत आदरणीय शरद पवार साहेबांच्या डोक्यात कधीही संशयाचं भूत राहत नाही. मी जिथे जातो तिथे प्लेन काम करतो, एवढाच मला नेहमी शेरा मिळतो आणि त्याच्यावरच मी खुश राहतो,’ असं नरहरी झिरवाळ म्हणाले. जयंत वानोळे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केलं. नरहरी झिरवाळ यांच्या या वक्तव्यामधून शरद पवार यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधांचा आणि विश्वासाचा उल्लेख त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us