Rupali Patil | ‘Hindustani Bhauसारख्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे’
प्रसिद्धीसाठी 'विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा "भाईजान" कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे. तत्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी, अशाप्रकारचं ट्विट राष्ट्रवादी(NCP)च्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी केलं आहे.
प्रसिद्धीसाठी ‘विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा “भाईजान” कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे. तत्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी, अशाप्रकारचं ट्विट राष्ट्रवादी(NCP)च्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी केलं आहे. हिंदुस्थानी भाऊ म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीकडून विद्यार्थ्यांना आंदोलन (Agitation) करण्यासाठी चिथावणी दिली जातेय, असं पाटील यांचं म्हणणं आहे. अशा अशांतता पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा पाटील यांचा रोख आहे. बोर्डाच्या ऑफलाइन परीक्षा या रद्द करून ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात याव्या, याकरता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भडकवण्याचा काम हे एका यूट्यूबवर असलेल्या भावेश शर्मा आणि हिंदुस्तान भाऊ करत होते. गेल्या 3 ते 4 दिवसात या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर ते व्हिडोओ शेअर करत विद्यार्थ्यांना गोळा करत होते. नागपूर, पुणे, मुंबई या महत्त्वाच्या शहरांमध्ये ही आंदोलनं नियोजित होती.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

