केवळ फक्त रक्ताचे वारस म्हणून…आनंदराज आंबेडकरांवर राष्ट्रवादीचा संताप, त्या विधानामुळे वातावरण तापलं!

आनंदराज आंबेडकर एका जाहीर सभेत बोलते होते. यावेळी बोलताना या देशात, महाराष्ट्रात शेतकऱ्याचा विचार करणारे राज्यकर्ते नाहीत. आमच्याकडे मुर्खपणा करणारे राजकारणी आहेत, अशी टीका उमेश पाटील यांनी केली.

केवळ फक्त रक्ताचे वारस म्हणून...आनंदराज आंबेडकरांवर राष्ट्रवादीचा संताप, त्या विधानामुळे वातावरण तापलं!
anandraj ambedkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2026 | 4:21 PM

Anandraj Ambedkar : रिपब्लिकने सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव घेत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. सोबतच आनंदराज यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आलीय. दरम्यान, आनंदराज आंबेडकर यांच्या विधानावर अजित पवार यांच्या विधानावर सोलापूरमधील नेते उमेश पाटील यांनीही संताप व्यक्त केलाय.

आम्ही त्या वक्तव्याचा निषेध करतो

आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहेत. अजितदादा आज हयात नाहीत. सार्वजनिक ठिकाणी आपण त्यांच्याबद्दल बोलत नाही. आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी पक्ष निषेध करतो, असे उमेश पाटील म्हणाले.

Loading...

केवळ फक्त रक्ताचे वारस म्हणून…

आनंदराज आंबेडकर यांनी माफी मागितली पाहिजे. सारवासारव चालणार नाही. अजित दादांच्या कार्याची ओळख सांगण्याची वेगळी गरज नाही. पण महाराष्ट्र आजही दादांच्या संदर्भात हळहळतोय. अजित दादा हयात नसताना त्यांच्याबद्दलचे विधान शोभणारे नाही, अशी टीकाही उमेश पाटील यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचला नाही. केवळ फक्त रक्ताचे वारस म्हणून आपण लोकांच्या पुढे जात आहात. विचाराचा वारसदार म्हणून पुढे जाताना समाज निश्चितच तुलना करत असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

आनंदराज आंबेडकर काय म्हणाले होते

आनंदराज आंबेडकर एका जाहीर सभेत बोलते होते. यावेळी बोलताना “या देशात, महाराष्ट्रात शेतकऱ्याचा विचार करणारे राज्यकर्ते नाहीत. आमच्याकडे मुर्खपणा करणारे राजकारणी आहेत. पाणी आडवा आणि पाणी जिरवा असे राजकारणी सांगतात. परंतु जिथे पाऊसच पडत नाही, तिथे काय अजितदादांना आणायचं काय? पाणी जिरवायचं कुठं?” असं विधान आनंदराज आंबेडकर यांनी केले. या विधानावर वाद झाल्यानंतर अजितदादांनी पाण्याबाबत एक विधान केलं होतं. त्याच विधानाच्या आधारावर उपरोधिकपणे मी विधान केलं, अशी सारवासारव त्यांनी केली. दरम्यान, आनंदराज आंबेडकर यांनी माफी मागावी अशी मागणीही राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केलीय. त्यामुळे आता या प्रकरणात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us