AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं…रोहित पवारांचे खोचक ट्विट, काय म्हणाले रोहित पवार…

कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे काढले आहे.

रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं...रोहित पवारांचे खोचक ट्विट, काय म्हणाले रोहित पवार...
Image Credit source: Google
| Updated on: Dec 07, 2022 | 11:16 AM
Share

अहमदनगर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर खोचक टीका केली आहे. सूरतवारी ते सरकार पाडण्यापर्यंतचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवरून टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद हा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करत अडवणूक केली जात आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील आक्रमक होत आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये न येऊ देण्याचा फतवा काढत आहे. त्यामुळे एकीकडे कर्नाटक सरकार आक्रमक होत असतांना महाराष्ट्राची भूमिका काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली असतांना शिंदे-फडणीवस सरकारची भूमिका स्पष्ट होत नसल्याची बाब हेरून आमदार रोहित पवार यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे काढले आहे.

वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी #कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही?

पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?

आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू… करू… केंद्राशी बोलू… ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही!

असे वरील आशयाचे ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी सूरतवारी ते सरकार पाडण्यापर्यन्त संदर्भ देत महाराष्ट्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

मंगळवारी कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांना कर्नाटकमधील नागरिकांनी दिलेल्या त्रासावरुन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही इशारा दिला आहे.

एकूणच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतिने कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचा मुद्दा अधिक प्रभावी आणि आक्रमकपणे मांडला जात असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.