AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! माजी आमदाराने सोडली शरद पवारांची साथ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

धाराशिव जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका माजी आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) दुपारी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे.

मोठी बातमी! माजी आमदाराने सोडली शरद पवारांची साथ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश
sharad-pawar-and-ajit-pawar-3
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 04, 2025 | 6:01 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते पक्षांतर करत असलेले दिसत आहेत. अशातच आता धाराशिव जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका माजी आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) दुपारी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राहुल मोटे

धाराशिव जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे उद्या दुपारी तीन वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे कार्यकर्त्यासह राहुल मोटे हे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील राहुल मोटे यांचे कार्यकर्ते प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. प्रवेशासाठी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यकर्त्यांनी केलं आहे. विधानसभेला शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात राहुल मोटे यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणीतही धक्का

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्रानी आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते येत्या 7 तारखेला मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. दुर्राणी यांच्या समर्थकांकडून 7 तारखेला काँग्रेस पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे परभणीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

माजी आमदार बाबाजानी दुर्रानी हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याआधी ते अजित पवारांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र काही कारणांमुळे हा प्रवेश रखडल्यामुळे दुर्राणी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा