AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना मोठा धक्का बसणार? पक्षाच्या खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, शिंदेंची भेट घेताच…, राजकारणात मोठी खळबळ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, बुधवारी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

शरद पवारांना मोठा धक्का बसणार? पक्षाच्या खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, शिंदेंची भेट घेताच..., राजकारणात मोठी खळबळ
SHARAD PAWARImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 5:06 PM
Share

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, राज्यात ऑपरेशन टायगर झालं, शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरनंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून मात्र ऑपरेशन तुतारीचं खंडण करण्यात आलं आहे. आमचा एकही आमदार खासदार दुसऱ्या पक्षात जाणार नाही असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे.  ‘शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत,  ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते. पवारांचे खासदार अस्वस्थ आहेत, पण ते पक्ष सोडतील की नाही माहिती नाही’  असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.  बुधवारी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, या भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला आहे, या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदे , चव्हाण भेट 

दरम्यान बुधवारी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आता एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 30 मिनिटं चर्चा झाली.  या भेटीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट