AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…त्या शेवटच्या तीन दिवसात मतदार याद्यात मोठा घोळ”, सुप्रिया सुळे यांच्या सर्वात मोठ्या आरोपाने खळबळ

महाराष्ट्रात ते कसे जिंकले आणि आम्हाला कशा पद्धतीने हरवले हे आम्ही दाखवलं आहे. निवडणूक आयोगावर जे कफन टाकलं आहे. त्याचा त्यांनी उत्तर द्यावं, असे संजय राऊत म्हणाले.

...त्या शेवटच्या तीन दिवसात मतदार याद्यात मोठा घोळ, सुप्रिया सुळे यांच्या सर्वात मोठ्या आरोपाने खळबळ
rahul gandhi supriya sule sanjay raut
| Updated on: Feb 07, 2025 | 1:40 PM
Share

राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र आता या निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जातो. आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला अनेक सवाल विचारले. आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही. आम्ही आरोप केले पाहिजे. पण आरोप करत नाही. फक्त आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी निवडणूक आयोगाने द्यावी. नाव, पत्ता आणि फोटोग्राफसह द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊतही उपस्थित होते.

संजय राऊत काय म्हणाले?

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली. जर या देशातील निवडणूक जिवंत असेल, तर जे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्यात आले, त्यांनी त्याचे उत्तर दिलं पाहिजे. पण आयोग उत्तर देणार नाही. कारण हा आयोग सरकारची गुलामी करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार जाऊन डोकं आपटलं. पण निवडणूक आयोग मेला आहे. हे जे ३९ मते कुठून आले. आता हे ३९ लाख मते बिहारमध्ये जाणार. हे फ्लोटिंग वोट आहेत. तेच नाव, तेच आधारकार्ड राहिले. काही दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्र पॅटर्न आणि आम्ही पाहिला. आता बिहारमध्ये जातील, नंतर यूपीत जाईल. हे लोक याच पॅटर्नने जिंकत आहे. देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल, विधानसभा आणि लोकसभा जिवंत ठेवायची असेल तर सवाल केले पाहिजे. महाराष्ट्रात ते कसे जिंकले आणि आम्हाला कशा पद्धतीने हरवले हे आम्ही दाखवलं आहे. निवडणूक आयोगावर जे कफन टाकलं आहे. त्याचा त्यांनी उत्तर द्यावं, असे संजय राऊत म्हणाले.

“बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा”

यानंतर सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. “धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. पण मशीन बंद करा. राज ठाकरेंनीही त्यांच्या उमेदवाराला त्याचंही मत मिळालं नसल्याचं सांगितलं. आम्ही आणि शिवसेना तिथे लढलो. आमचा पक्ष फोडला. आमदार फोडले. आम्ही अजूनही लढत आहोत. आम्हाला तुतारी चिन्ह दिलं. या सरकारमधील एक मंत्री आहेत. त्याने सांगितलं की, साताऱ्यातील सीट एनसीपी पराभूत झाली कारण ट्रम्पेट आणि तुतारीमुळे झाले. आम्ही तुतारी हटवण्याची मागणी केली. सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचं आम्ही सांगितलं. तरीही त्यांनी चिन्ह बदललं नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. ११ जागा आमच्या अशा गेल्या”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“आम्ही मतदार यादी मागत आहोत”

“मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत. त्या द्या. बाकी काय मागत आहोत”, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.

“शेवटच्या तीन दिवसात ही नाव वाढली”

“ऑनलाईन नाव वाढवू शकतात. मी रोज मॉनिटर करायचे. शेवटच्या तीन दिवसात आम्ही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यावेळी ही नाव वाढली. लाडकी बहीण योजनेतही बोगस आधारकार्ड मिळाले आहेत”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?