NEET चे आंदोलन ते शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, जाणून घ्या झुरळांनी सर्व गेम कसा फिरवला…

नीट पेपर लीक परीक्षा घोटाळा प्रकरणात वाढत्या संघर्ष आणि तरुणांचा देशभरातील असंतोष पाहून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा अखेर दिला आहे. मात्र हे प्रकरण राजीनाम्यापर्यंत नेमके कसे पोहचले याचा घेतलेला हा धांडोळा....

NEET चे आंदोलन ते शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, जाणून घ्या झुरळांनी सर्व गेम कसा फिरवला...
dharmendra pradhan
| Updated on: Jul 25, 2026 | 4:48 PM

NEET UG 2026 पेपर लीक प्रकरणात जुलै महिन्यात मोठा घटनाक्रम घडला आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन उभारत दिल्लीच्या जंतरमंतरला अनेक आठवडे निदर्शने केली. सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी संसद ते रस्त्यावर हे आंदोलन आणले. २० जुलै रोजी पोलिसांनी बेछुट लाठीमार केल्याने हे आंदोलन जगभरात पोहचले. आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मात्र या आंदोलनाचा घटनाक्रम काय आहे हे पाहूयात….

केवळ परीक्षेतील घोटाळ्या पर्यंत मर्यादित राहीला नाही. गेल्या महिन्यात देशाची सर्वात मोठी राजकीय घडामोड हे आंदोलन बनले आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे हे आंदोलन, संसदेत सतत विरोधकांच्या गोंधळाने आणि देशभरात झेन जी रस्त्यावर उतरल्याने अखेर काल सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन मागण्या मान्य केल्या आणि आज ( शनिवार ) दुपार दोनची वेळ मागून घेतली. आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा पंतप्रधानांकडे सोपवला आहे.

२५ जुलै २०२६ रोजी अखेर नीट पेपर लीक परीक्षा घोटाळा प्रकरणात आंदोलकाचा रेटा पाहून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. ज्यात फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद केली आहेत. चला तर पाहूयात नीट पेपर लिकचे प्रकरण अखेर शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यापर्यंत नेमके कसे पोहचले..

हा संपूर्ण वाद मे २०२६ मध्ये सुरु झाला होता. ३ मे २०२६ ला देशभरात नीट युजी परीक्षा झाली होती. या परीक्षेला सुमारे २२ ते २४ लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या काही दिवसातच म्हणजे या परीक्षेचा संभाव्य प्रश्नसंचाच्या नावाने परीक्षेत येणारी खरी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी ७ मेच्या आसपास येऊ लागल्या. त्यानंतर अखेर १२ मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी NTA ने संपूर्ण परीक्षा रद्द केली. यासोबतच सीबीआयने देखील या परीक्षा फुटीचा तपास सुरु केला.

१५ मे रोजी स्वत: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका प्रेस ब्रिफींगमध्ये स्वीकारले की पेपर फुटला आहे. त्यांनी हा प्रकार कमांड चेनमध्ये झालेल्या त्रुटीमुळे झाल्याची कबुली दिली. यानंतर २१ जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला.

या दरम्यान एक आणखी रंजक घटना घडली. १५ आणि १६ मे रोजी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायधीश सुर्य कांत यांनी तरुणांवर टिप्पणी केली आणि ती व्हायरल झाली. सुर्य कांत यांनी तरुणांना झुरळांची उपमा दिली. या टिप्पणीने प्रेरित होऊन १६ मे रोजी अभिजीत दीपके यांनी सहज एक गंमत म्हणून कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP नावाच्या सोशल मीडियावर एक मोहिम सुरु केली.

सुरुवातीला एक ऑनलाईन चेष्टा- मस्करीचा विषय म्हणून सुरु झालेल्या या मोहिमेत लाखो फॉलोअर जोडत केले. नीट परीक्षा रद्द झाली तसे या सोशल मीडियामंचावर तरुणांनी अभिजीत दीपके यांना पाठींबा दिला. तरुणांचा राग व्यक्त करण्याचे हे एक माध्यम बनले.

जूनच्या महिन्यात आंदोलन आणखी तीव्र झाले. ६ जून रोजी सीजेपीने आपले सर्वात मोठ निदर्शन दिल्लीच्या जंतरमंतर येथे झाले. या आंदोलकांची प्रमुख तीन मागण्या होत्या. पहिली मागणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्या, दुसरी मागणी परीक्षा प्रणालीत आमुलाग्र सुधारणा कराव्यात. आणि तिसरी मागणी ज्या विद्यार्थ्यांनी या तणावातून आत्महत्या केली त्यांना नुकसान भरपाई मिळावी.

२० जून रोजी ही निदर्शन आणखी गंभीर झाली. कारण निदर्शकांनी अनिश्चितकाळासाठी धरणे सुरु झाले. त्यांचे म्हणणे होते जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत ते जंतर मंतरवरुन हटायचे नाही. या दरम्यान लडाखचे पर्यावरण वादी आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि आमरण उपोषण सुरु केले. जे तब्बल २६ दिवस चालले.

पहाता पाहाता हे आंदोलन संपूर्ण देशभरात पसरले आणि जंतरमंतरवर हजारो संख्येने विद्यार्थी जमा होऊ लागले. तरुण आणि समर्थक जमा होऊ लागले. या दरम्यान २१ जून रोजी पुन्हा नीटची परीक्षा झाला. त्याचे निकालही लागलीच जाहीर करण्यात आले. परंतू या नंतर लोकांमधील राग कमी झाला नाही.

जुलै महिना या संपूर्ण निदर्शनांनी तणावाचा गेला आहे. २० जुलै रोजी सीजेपी यांनी चलो संसद नावाने सर्वात मोठा मोर्च्याची घोषणा केली. पोलिसांनी संपूर्ण संसद आणि जंतरमंतर सह दिल्ली जिल्ह्यात जमावबंदीचे कलम जारी करीत आंदोलनला परवानगी नाकारली. तरीही तरुणांना संसदेच्या दिशेने कूच केले. या दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानूष लाठीमार केला. ज्यात अनेक तरुण आणि तरुणी जखमी झाले. या नंतरही जंतरमंतरवर निदर्शने सुरुच राहिली.

विरोध पक्षांनी तीन प्रमुख मागण्या केल्या

अनेक मोठ्या नेत्यांनी पंतप्रधान निवास लोक कल्याण मार्गाच्या दिशेने मार्च केला. पोलिसांना या राहुल गांधी यांच्या सह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. विरोध पक्षांनी तीन प्रमुख मागण्या केल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि २० जुलै रोजी पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांची सार्वजनिक पातळीवर माफी मागावी.

या दरम्यान संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु झाले त्यात नीट पेपर लीकचा मुद्यावर संसद विरोधकांनी ठप्प केली. विरोधी सदस्यांनी रोज संसदेत वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे लोकसभा आणि राज्यसभा वारंवार ठप्प झाली.

सरकारने आपण या मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचे विरोधकांना वारंवार सांगितले. मात्र, विरोधकांनी आधी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच चर्चा होईल असे बजावले. २४ जुलै रोजी संसद अनेकदा ठप्प झाली. राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही आणि पंतप्रधान माफी मागत नाहीत, तोपर्यंत कोणतीही बातचीत होऊ शकत नाही.

याच दरम्यान २३ जुलैच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक व्हिडीओ संदेश जारी केला. या व्हिडीओत त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर स्पष्टीकरण दिले. नीट प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याची घोषणा केली. या प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद करणारे विधेयक आणण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याच दिवशी सीजेपीचे दोन प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी दुसऱ्यांदा भेटले. या भेटी दिल्लीतील कॉन्स्ट्युशन क्लब आणि विज्ञान भवनात झाल्या.

या भेटीत सीजेपी यांनी तीन मागण्या केल्या. पहिली मागणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरी मागणी नीट प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी. किमान एक कोटी रुपयांची ही भरपाई असावी. तसेच तिसरी मागणी ज्या निदर्शकांवर गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्यावेत. २० जुलै रोजीच्या पोलिसी कारवाई बद्दल सार्वजनिक रुपात माफी मागावी.

सरकारने यातील दोन मागण्या नुकसान भरपाई आणि गु्न्हे मागे घेण्याच्या मागण्यांना सकारात्मकता दाखवण्यात आली. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारने आंदोलकांकडून काही वेळ मागून घेतला. या प्रकरणावर २५ जुलै ( शनिवारी ) दुपारी दोन वाजताचा वेळ सरकारने दिला. सीजेपीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा आल्याशिवाय आंदोलने थांबणार नाहीत असे सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला

सुरुवातीला सरकारच्या सूत्रांचे म्हणणे होते की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सध्या सरकारच्या अजेंड्यावर नाही. आणि सरकारचे संपूर्ण लक्ष परीक्षेतील सुधारणा, सुरक्षित यंत्रणा आणि कठोर कायदा स्थापन करण्यावर सरकारचे प्राधान्य आहे. परंतू अखेर आज शनिवारी ( २५ जुलै २०२६ ) शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. सध्या जंतरमंतरवर मोर्चा सुरुच आहे आणि येत्या काही दिवसात सरकार आणि सीजेपी यांच्या दरम्यान चर्चेच्या आणखीन फेऱ्या होऊ शकतात. या प्रकरणात संसदेत देखील विरोधकांचा विरोध सुरुच आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us