AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi-Putin Meet 2026 : पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास आहे?

Modi-Putin Meet 2026 : सध्या भारतात ब्रिक्स परिषद सुरु आहे. त्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारतात आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना एक खास पुस्तक गिफ्ट केलं. 2000 वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकात काय खास आहे?.

Modi-Putin Meet 2026 : पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास आहे?
Modi-Putin Meet 2026
| Updated on: Sep 11, 2026 | 10:41 PM
Share

ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. आज नवी दिल्लीत ब्रिक्स परिषदेची औपचारिक सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात भारत मंडपम येथे भेट झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्रपती पुतिन यांना तामिळमधील गाजलेलं तिरुक्कुरल हे रशियन अनुवादित पुस्तक गिफ्ट म्हणून दिलं. तिरुक्कुरल हे तामिळ संत तिरुवल्लुवर यांचं पुस्तक आहे. पीएम मोदींनी पुतिन यांना हे पुस्तक भेट देताना त्याची माहिती दिली. दोन्ही देशांचे सांस्कृतिक संबंध वाढवण्यात या पुस्तकाची भूमिका राहील असं पीएम मोदी म्हणाले.

संत तिरुवल्लुवर यांनी या पुस्तकात मानवी जीवनाची अनेक वैशिष्ट्य सांगितली आहेत. पीएम मोदी यांनी हे पुस्तक भेट देताना पुतिन यांना त्याची माहिती दिली. रशियन भाषेत या पुस्कातचं ट्रान्सलेशन झालं आहे. जन संपर्क वाढवण्यासह, सांस्कृतिक संबंध भक्कम करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाचा फायदा होईल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

हे पुस्तक काय शिकवतं?

तिरुक्कुरल तामिळ साहित्यातील सर्वात महान आणि विश्व प्रसिद्ध रचनांपैकी एक आहे. याला तामिळ वेदही म्हटलं जातं. या पुस्तकाचं रशियनसह अनेक भाषांमध्ये भाषांतर झालं आहे. हे पुस्तक 2000 वर्षांपूर्व लिहिण्यात आलेलं. तिरुक्कुरल हे तिरुवल्लुवर यांनी लिहिलेलं क्लासिक तामिळ साहित्य आहे. तिरुक्कुरल तामिळ भाषेतील एक प्राचीन नैतिक साहित्य आहे. जीवन-मृत्यू यामध्ये जे अंतर आहे, त्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल वाचकांना हे पुस्तक शिकवते.

या पुस्तकाचं कोणी-कोणी कौतुक केलय?

तामिळ लोक तिरुवल्लुवर यांना प्राचीन संत, कवी आणि दार्शनिक म्हणून भरपूर सन्मान देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या अनेक भाषणात त्यांचा उल्लेख केला आहे. तिरुक्कुरल तामिळ साहित्याची ओळख आहे. तामिळनाडूच्या शाळांमध्ये या बद्दल शिकवलं जातं. प्रत्येक कुटुंबात याला सन्मानाचं स्थान आहे. महात्मा गांधी, लियो टॉल्स्टॉय सारख्या महान व्यक्तींनी या पुस्तकाची प्रशंसा केली आहे. कन्याकुमारीत तिरुवल्लुवर यांची विशाल मुर्ती हे याच सन्मानचं प्रतीक आहे. भारतीय साहित्यामध्ये रशियाला 17 व्या शतकापासून इंटरेस्ट आहे. युरोपियन भाषांमध्ये याचा अनुवाद झाल्यानंतर तिरुक्कुरलने रशियन विद्धावानांचं, साहित्यकारांचं लक्ष वेधून घेतलं.

Follow Us
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?
नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय....
Nagpur MLC Election 2026 Result : नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय परिणाम होणार?
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
Maharashtra MLC Election 2026 Result : एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
Shivsena : शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी