सुनील तटकरे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा; ‘त्या’ वक्तव्याला उत्तर देताना म्हणाले…

Sunil Tatkare on Supriya Sule : अजित पवार गटाचे नेते, सुनील तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यातील उल्लेखाला विरोध केला आहे. तसंच आपल्यासाठी हा विषय संपला असल्याचंही ते म्हणाले आहेत. वाचा सविस्तर...

सुनील तटकरे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा; त्या वक्तव्याला उत्तर देताना म्हणाले...
| Updated on: Nov 09, 2023 | 2:00 PM

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 09 नोव्हेंबर 2023 : अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर यांच्यावर टीका केली आहे. अलीकडच्या काळात संसदरत्न या माझा उल्लेख ती व्यक्ती, तो व्यक्ती असा करतात. ज्यावेळी नैराश्य येत त्यावेळी अशी वक्तव्य केली जातात. आता मी रायगडचा खासदार आहे. मणिपूरबाबत संसदेत प्रस्ताव आला. त्यानंतर त्यांनी पुन्हा तो व्यक्ती असा उल्लेख केला होता. मी शूद्र आहे म्हणून असा उल्लेख त्यांनी केला का? आता माझ्याकडून हा विषय संपला आहे, राज्याला माहीत आहे सुनील तटकरे कोण आहे, असं म्हणत सुनील तटकरे यांची सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“ठाकरेंचं आजरपणही राजकीय?”

ठाकर गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या आजारपणावर भाष्य केलं आहे. अजित पवार यांचं आजारपण राजकीय असल्याचं राऊत म्हणाले. त्यावर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणतात अजित दादांना राजकीय आजारपण आलंय. तर मग कोरोना काळात उद्धव ठाकरे आजारी होते. त्यांचाही आजार राजकीय होता का?, असा सवाल तटकरे यांनी विचारला आहे.

“दादांचं नेतृत्व महाराष्ट्रानं स्विकारलं”

आमचं मत तेव्हा आम्ही आयोगात मांडलं होतं. याचिकेच्या बाबत आम्ही युक्तिवाद केला आहे. महाराष्ट्रात दादांच्या निर्णयाचं महाराष्ट्र राज्य स्वागत करणार नाही. असं बोललं जात होतं. पण ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला 2 नंबरच्या जागा मिळाल्या. ते यश म्हणजे आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात घेतलेली भूमिका जनतेने स्विकारल्याचं प्रतिक आहे. आम्ही नवं घोषवाक्य घेऊन आम्ही राज्याचा दौरा सुरू केला आहे. तिथं अनुभवायला मिळालं की लोक आमच्यासोबत आहेत. तरुणांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. या दौऱ्यानंतर दादा राज्यात काम करू शकतात हे दिसून आलंय. आम्ही दिवाळी नंतर पुन्हा बाकी दौरा करणार आहोत, असं सुनील तटकरे म्हणालेत.

मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावं, ही आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकल नव्हतं. मी राजकीय टीका करणार नाही. पण महाविकास आघाडीने थोडं न्यायालयात गांभीर्याने बघितलं असतं तर ते टिकलं असतं, असं म्हणत मराठा आरक्षणावर तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.