AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New India Co Operative Bank : न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात बडा मासा गळाला, पोलिसांची मोठी कारवाई

न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी बँक घोटाळा प्रकरणात बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला ताब्यात घेतलं आहे. 

New India Co Operative Bank : न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात बडा मासा गळाला, पोलिसांची मोठी कारवाई
| Updated on: Feb 15, 2025 | 5:34 PM
Share

न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी बँक घोटाळा प्रकरणात बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला ताब्यात घेतलं आहे.  आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हितेश मेहताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये त्याने आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर खळबळजनक कबुली दिली आहे. बँकेमधील 122 कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं काढून ओळखीतल्या लोकांना दिल्याची कबुली मेहताकडून देण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हितेश मेहताने प्रभादेवीच्या कार्यालयातून 112 कोटी तर गोरेगावच्या कार्यालयातून 10 कोटी गायब केले आहेत.  सध्या हितेश मेहता आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.  हितेश मेहताला आजच अटक देखील होऊ शकते.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बँकेत तब्बल 122 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सबंधित प्रकरणात जबाबदार असणाऱ्या हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याने आरबीआय अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये आपला गुन्हा कबुल केल्याची माहिती समोर येत आहे. १९९० पासून हितेश मेहता या बँकेत कार्यरत आहे. हितेश मेहताची चौकशी सध्या सुरू आहे. या सर्व रकमेची त्याने रोख स्वरुपात अफरातफर केल्याची माहिती समोर आली आहे.

6 महिन्यांसाठी बंदी

घोटाळा उघड झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या बँकेवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेवर बंदीचं वृत्त समोर येताच पैसे काढण्यासाठी ठेवीदारांनी एकच गर्दी केली. अनेकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. या बँकेच्या देशभरात एकूण 26 शाखा आहेत. यामध्ये लाखो ठेविदारांनी आपला पैसा गुंतवला आहे. बँकेवर बंदी आल्यामुळे ठेवीदारांची धाकधूक वाढली आहे.

आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला ताब्यात घेतलं आहे.  आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने घोटाळ्याची कबुली देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरानं चांगलीच खळबळ उडाली आहे.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...