महाराष्ट्रात किती टक्के महिलांवर पतीकडून हिंसाचार? NHS च्या अहवालात धक्कादायक खुलासे

| Updated on: Dec 20, 2020 | 12:49 AM

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या (NHS) अहवालात महाराष्ट्रातील विवाहित महिलांवरील हिंसाचाराची आकडेवारीचा खुलासा करण्यात आलाय. या प्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास 27 टक्के विवाहित महिलांना (Married Women) पतीकडून होणाऱ्या हिंसाचाराला (Spouse Violence) सामोरं जावं लागल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाच्या (NCRB) आकडेवारीनुसार पुण्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांचा दर 58.1 आहे (NHS survey 27 percent married women have experienced […]

महाराष्ट्रात किती टक्के महिलांवर पतीकडून हिंसाचार? NHS च्या अहवालात धक्कादायक खुलासे
Follow us on

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या (NHS) अहवालात महाराष्ट्रातील विवाहित महिलांवरील हिंसाचाराची आकडेवारीचा खुलासा करण्यात आलाय. या प्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास 27 टक्के विवाहित महिलांना (Married Women) पतीकडून होणाऱ्या हिंसाचाराला (Spouse Violence) सामोरं जावं लागल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाच्या (NCRB) आकडेवारीनुसार पुण्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांचा दर 58.1 आहे (NHS survey 27 percent married women have experienced spousal violence).

एनसीआरबीच्या (NCRB) अहवालानुसार, पुणे शहरात महिलांवर पती आणि नातेवाईकांकडून होणाऱ्या अत्याचाराचा (Violence) दर 13.6 टक्के आहे. बालकांविरोधात होणाऱ्या हिंसाचारावर बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Activist) किरण मोघे म्हणाल्या, “प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस (POCSO) कायद्यामुळे बाल लैंगिक शोषणाविषयी लोकांमध्ये बरीच जागृकता आली आहे.”

एनएचएसच्या सर्वेनुसार, महाराष्ट्रामध्ये 18 ते 29 वर्षे वयातील तरुण महिलांना मोठ्या प्रमाणात लैंगिक हिंसेचा सामना करावा लागला. राज्यात या प्रकारच्या अत्याचाराचा दर 6.2 टक्के आहे. महिलांविरोधातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये 2015-16 च्या तुलनेत यावर्षी 2.9 टक्क्यांनी वाढ झाली. यावर बोलताना सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे म्हणाल्या, “आता या प्रकरणांच्या नोंदी वाढल्या आहेत. या प्रकरणांमध्ये लोकांसोबतच पोलिसांमध्येही जागरुकता आली आहे. पोलीस पीडित महिलांसोबत अधिक संवेदनशीलपणे वागतात. त्यामुळे या प्रकरणांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यात लैंगिक हिंसेच्या प्रकरणांमध्येही वाढ झालीय.”

‘वैवाहिक बलात्काराविषयी महिलांमध्ये जागरुकता’

वैवाहिक हिंसाचाराविषयी बोलताना किरण मोघे म्हणाल्या, “विवाहित महिलांना सहमती अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि त्यामुळेच त्यांना बलात्कारही कळतो. महिलांना वैवाहिक बलात्कारही व्यवस्थित कळतो. अनेक महिला यावर बोलतातही. महिलांमध्ये याविषयावर पुरेशी जागरुकता आहे. वैवाहिक हिंसा ही शारीरिक हिंसा आहे. याचप्रमाणे लग्नानंतर लैंगिक हिंसेचा अनेक महिलांवर वाईट परिणाम होतो.”

“वैवाहिक अत्याचार थांबवण्यासाठी वैवाहिक बलात्काराचा कायदा संमत व्हायला हवा. देशात बलात्कार झाल्यास कायदा आहे, मात्र, विवाहांतर्गत बलात्कार झाल्यास त्यावर कायदा नाही. असा कायदा व्हायला हवा. या कायद्याचाही इतर कायद्यांप्रमाणे प्रचार करायला हवा. त्यामुळे पीडितांना न्याय मिळेल,” असं मत मोघे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर मॉडेलचा बलात्कार केल्याचा आरोप, महिला आयोगाचं महाराष्ट्र पोलिसांना पत्र

झारखंडमध्ये नवऱ्यासमोर पत्नीचा 17 जणांकडून बलात्कार, महिला आयोगाने अहवाल मागवला

महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आता फाशीची सजा? वाचा दिशा कायद्याचा मसुदा

NHS survey 27 percent married women have experienced spousal violence