
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहे, मात्र यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना या निवडणुकीमध्ये दिसून येत नाहीये, तर अनेक ठिकाणी महायुतीमधीलच घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले असल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गमध्ये देखील असचं चित्र आहे. निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढल्याचं पहायला मिळालं होतं. दरम्यान या प्रकरणात निलेश राणे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. आता या प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका समोर आली आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं, नियमात बसत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे आता निलेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगानं काय म्हटलं?
काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी भाजपकडून मतदानारांना पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केला होता, या भाजप कार्यकर्त्याच्या घरातून त्यांनी फेसबुक लाईव्ह देखील केलं होतं. त्यानंतर भाजपकडून निलेश राणे यांचे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते, दरम्यान या प्रकरणी निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यावर आता निवडणूक आयोगाची भूमिका समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं, हे नियमात बसत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकला होता, तिथे आपल्याला पैसे मिळून आल्याचा दावा देखील त्यांनी केला होता, तसेच त्यांनी याचं फेसबुक लाईव्ह देखील केलं होतं. मतदारांना पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता, यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष चांगलाच वाढल्याचं पहायला मिळालं.