Nashik Election Results 2026 LIVE: नाशिक महापालिकेचा पहिला निकाल आला, प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनाचा दणदणीत विजय

Nashik Municipal Corporation NMC Ward 15 and 16 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 15 आणि 16 वर सर्वच पक्षांचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत या दोन्ही प्रभागातील 7 पैकी 4 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिक महापालिकेचा पहिला निकाल आला, प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनाचा दणदणीत विजय
Nashik Prabhag 15-16
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 12:19 PM

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचे निकास समोर येताना दिसत आहेत. नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडल्यानंतर 16 जानेवारीला निकाल जाहीर होत आहेत. . त्यामुळे नाशिकसह राज्यातील जनतेचे या निकालाकडे लक्ष असणार आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 15 आणि 16 मधील निकालावर सर्वांचे लक्ष असणार आहे. या प्रभागांमध्ये काय परिस्थिती आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रभाग 16 चा निकाल

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग 16 चा निकाल हाती आला आहे.  शिवसेना (शिंदे) चारही उमेदवार विजयी झाले आहेत. राहुल अशोक दिवे, आशा रफिक तडवी, पूजा प्रवीण नवले, ज्योती अनिल जोंधळे यांनी प्रभाग क्रमांक सोळा मधून विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक 15 (सिडको – अंबड / मोरवाडी परिसर)

प्रभाग क्रमांक 15 हा प्रामुख्याने सिडको (CIDCO) आणि अंबड विभागाचा भाग आहे. या प्रभागाचा विस्तार मोरवाडी गावठाण, सिडकोतील काही प्रमुख वसाहती, आयटीआय सिग्नल परिसर आणि अंबड एमआयडीसीला लागून असलेल्या निवासी क्षेत्रापर्यंत पसरलेला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार आणि 2017 च्या प्रभाग रचनेनुसार, या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 38000 ते 42000 च्या दरम्यान आहे. हा प्रभाग प्रामुख्याने ‘कामगार आणि मध्यमवर्गीय’ वस्ती म्हणून ओळखला जातो. या प्रभागाचा विकास प्रामुख्याने रस्ते सुधारणा आणि एमआयडीसी जवळ असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण या मुद्द्यांवर केंद्रित असतो.2017 च्या निवडणुकीत येथे भारतीय जनता पक्षाचे (BJP) वर्चस्व राहिले होते. या त्रिसदस्यीय प्रभागातून प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अर्चना थोरात या भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.

प्रभाग क्रमांक 16 (सिडको – सिडको बस डेपो / विनयनगर परिसर)

प्रभाग क्रमांक 16 मध्ये सिडको बस डेपो परिसर, विनयनगर, राणे नगरचा काही भाग आणि सिडकोच्या 4 थ्या योजनेचा समावेश होतो. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 39500 ते 43500 च्या आसपास आहे. हा परिसर नाशिकमधील सर्वात गजबजलेल्या आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असल्याने या प्रभागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिडकोतील नागरी सुविधा, ड्रेनेज लाईन आणि उद्यानांचे व्यवस्थापन हे येथील प्रमुख विषय आहेत. 2017 साली या प्रभागातून सुषमा पगारे (राष्ट्रवादी) आशा तडवी (काँग्रेस) अनिल ताजनपुरे (भाजप) राहुल दिवे (काँग्रेस) यांनी विजय मिळवला होता.

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नाशिक महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us