Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकमधून भाजपसाठी गुड न्यूज, प्रभाग क्रमांक 23 मध्ये कमळ फुललं

Nashik Municipal Corporation NMC Ward 23 and 24 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 23 वर भाजपचे वर्चस्वस्व आहे. येथील चारगी जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 24 वर शिवसेनेचे वर्चस्व आहे.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकमधून भाजपसाठी गुड न्यूज, प्रभाग क्रमांक 23 मध्ये कमळ फुललं
Nashik Ward 23 and 24
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 3:15 PM

नाशिक महानगरपालिकेच्या आगामी 2026 च्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 23 आणि 24 हे नाशिक रोड विभागातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे प्रभाग मानले जातात. या प्रभागांमध्ये नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या परिसरातील जुन्या आणि नवीन वस्त्यांचा समावेश होतो. या प्रभागांमधील विजयी उमेदवारांची माहिती जाणून घेऊयात.

प्रभाग क्रमांक 23 चा निकाल

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 चा निकाल समोर आला आहे. भाजपचे चार ही उमेदवार विजयी झाले आहेत.

गट अ – रुपाली यशवंत निकुळे – 13044

गट ब – मंगला प्रकाश नन्नावरे – 8626

गट क – कुलकर्णी संध्या अभिजीत – 13638

गट ड – खोडे चंद्रकांत कारभारी – 9124

प्रभाग क्रमांक 23

या प्रभागाचा विस्तार प्रामुख्याने जेल रोड, नारायण बापू नगर, शिवशक्ती नगर, कॅनल रोड आणि टाकळी रोडच्या काही भागापर्यंत आहे. हा परिसर नागरी वस्तीने दाट भरलेला असून येथे गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार आणि 2025 च्या नवीन प्रभाग रचनेनुसार, या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 40000 ते 44000 च्या दरम्यान आहे. येथे मिश्र लोकवस्ती असून मध्यमवर्गीय नोकरदार आणि व्यावसायिकांचे प्राबल्य आहे. जेल रोडवरील वाढती वाहतूक आणि अरुंद रस्ते ही येथील सर्वात मोठी समस्या आहे. तसेच उन्हाळ्यात काही उंच भागातील वसाहतींना कमी दाबाने पाणी मिळण्याच्या तक्रारी वारंवार उद्भवतात. उपनगरांच्या अंतर्गत भागात घंटागाड्या वेळेवर न येण्यामुळे कचऱ्याचे ढीग साचण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा, सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे हे चारही उमेदवार विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक 24

प्रभाग क्रमांक 24 मध्ये देवळाली गावचा उर्वरित भाग, स्टेशन वाडी, लोखंडे मळा, आणि सिन्नर फाटा परिसराचा काही भाग येतो. हा भाग नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्याने येथे व्यापारी आणि निवासी अशा दोन्ही स्वरूपाची वर्दळ असते. या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 38500 ते 42500 च्या आसपास आहे. रेल्वे आणि संबधित व्यवसायातील कामगार वर्गाची संख्या येथे मोठी आहे. देवळाली गाव आणि स्टेशन वाडी हा जुना भाग असल्याने येथील ड्रेनेज यंत्रणा वारंवार तुंबते, विशेषतः पावसाळ्यात येथील सखल भागात पाणी साचते. रेल्वे स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यांवर पदपथांवर झालेली अतिक्रमणे ही पादचाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रांची कमतरता आणि रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट्सची अपुरी सोय यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. गेल्या निवडणुरीत या प्रभागातून कल्पना पांडे (शिवसेना) राजेंद्र महाले (राष्ट्रवादी) कल्पना चुंबळे (शिवसेना) प्रवीण तिदमे (शिवसेना) या उमेदवारांनी विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नाशिक महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us