आता त्यांच्या पक्षात एका टोयोटा इनोव्हामध्ये बसतील एवढेच आमदार शिल्लक, भाजप नेत्याने सुप्रिया सुळेंना डिवचलं

सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरून जोरदार हल्लाबोल केला होता, दरम्यान या टीकेला आता भाजप नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या पक्षात एका टोयोटा इनव्हामध्ये बसतील एवढेच आमदार शिल्लक असल्याचं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

आता त्यांच्या पक्षात एका टोयोटा इनोव्हामध्ये बसतील एवढेच आमदार शिल्लक, भाजप नेत्याने सुप्रिया सुळेंना डिवचलं
supriya sule
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 3:00 PM

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता त्यांच्या पक्षात एका टोयोटा इनोव्हामध्ये बसतील एवढेच आमदार शिल्लक आहेत, असा खोचक टोला यावेळी भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. राज्याचे प्रश्न सोडवण्याकरता आमचं सरकार अग्रभागी आहे, मी सुप्रिया सुळे यांना एवढंच सांगेन की उरला सुरला पक्ष सांभाळण्याचं काम करा आणि जनतेची सेवा करा, असंही यावेळी भातखळकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले भातखळकर?

भाजप नेते, आमदार आतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याचे प्रश्न सोडवण्याकरता आमचं सरकार अग्रभागी आहे. पक्ष फोडायला आता पक्ष तर शिल्लक पाहिजे ना, त्यांच्या पक्षात एक टोयोटा इनोव्हामध्ये बसतील एवढेच त्यांचे आमदार आहेत.  मी सुप्रिया सुळे यांना एवढेच सांगेन की उरला सुरला पक्ष सांभाळण्याचं काम करा आणि जनतेची सेवा करा, असा टोला यावेळी भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया 

सरकार सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे.  जात पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे चालत असते.  त्यांच्याशी देखील राज्य सरकारची सातत्याने चर्चा चालू आहे. दरम्यान परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यवरून मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे, यावर देखील भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार लोकांचे जनतेचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असते. महायुतीमध्ये शिवसेना आमचा घटक पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचा कार्यक्रम करण्याच्या पूर्ण अधिकार आहे, असं यावेळी भातखळकर यांनी म्हटलं.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, काम चलाऊ मराठी प्रत्येकाला आलं पाहिजे, हा कायदा आहे. पण जबरदस्ती न करणं हे सुद्धा सरकारचं धोरण आहे. या एका वर्षामध्ये सर्वजण काम चलाऊ मराठी शिकतील, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us