AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपुर शर्माला अटक करा : ॲड. प्रकाश आंबेडकर

तसेच मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याप्रकरणी नुपुर शर्मा यांच्याबाबतीत बोलताना, ते म्हणाले नुपूर शर्माला भाजपने निलंबित केलंय यावर मी समाधानी नाही. हा विषय फक्त मुस्लिम समाजा पूरता नाही. मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्यामुळे, त्यांचे नाव घेतल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय झाला आहे.

पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपुर शर्माला अटक करा : ॲड. प्रकाश आंबेडकर
ॲड. प्रकाश आंबेडकरImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 8:08 PM
Share

मुंबई : मोहम्मद पैगंबर (Mohammad Prophet) यांचा अवमान केल्याप्रकरणी देशात भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली. त्यानंतर शर्मा यांच्या त्या वक्तव्याचे राज्यातही पडसाद उमटले. त्यामुळे गेल्या आठवड्यात शुक्रवारी जुम्माच्या नमाजनंतर लाखो मुस्लिम राज्यातील विविध जिल्ह्यात रस्त्यावर उतरले. ज्यामुळे काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नुपुर शर्मा यांना अटक करण्याची मागणीला आता जोर धरत आहे. आता याच प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली. तसेच मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या नुपुर शर्मा यांना अटक करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच महाराष्ट्र सरकारने प्रलंबित ‘महंमद पैगंबर बिल’ त्वरित पारित कराव असंही त्यांनी म्हटलं आहे.

यावर मी समाधानी नाही

तसेच मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याप्रकरणी नुपुर शर्मा यांच्याबाबतीत बोलताना, ते म्हणाले नुपूर शर्माला भाजपने निलंबित केलंय यावर मी समाधानी नाही. हा विषय फक्त मुस्लिम समाजा पूरता नाही. मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्यामुळे, त्यांचे नाव घेतल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय झाला आहे. नुपूर शर्माला अटक झालीच पाहीजे. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हिंदूची जबाबदारी कशी घेणार?

तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भारताबाहेर इतर देशात हिंदु मोठ्या संख्येने आहेत. इस्लामिक देशात सुद्धा त्यांची संख्या ही 85% आहे. जर असे भारतात होत असेल तर हिंदूची जबाबदारी कशी घेणार? तर राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, ही निवडणुक जाणता राजा विरूद्ध भाजप अशी होती. त्यात काय झाले हे सगळ्यांनाच माहित आहे.

मी पत्रकार परिषद घेऊन बोलेण

दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची सुरू असणाऱ्या चौकशी संदर्भात विचारले असता ते म्हणाले, राहूल गांधी विषयावर मी पत्रकार परिषद घेऊन बोलेण. हा विषय असा बोलण्यासारखा नाही.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.