AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडणार? घेणार मोठा निर्णय

राज्यात सध्या आरक्षणावरून मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालं आहे, लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून मिळत असलेल्या आरक्षणाला जोरदार विरोध केला आहे, मात्र ते आता लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत.

मोठी बातमी! लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडणार? घेणार मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2025 | 6:19 PM
Share

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नका, त्यांना स्वंतत्र्य आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील मोठा लढा उभारला आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून मिळणाऱ्या आरक्षणाला जोरदार विरोध केला आहे.

यावरून अनेकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे आमने-सामने आल्याचं देखील पहायला मिळालं. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली. मात्र आता लक्ष्मण हाके हे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत, त्याबद्दल त्यांनी तसे संकेत देखील दिले आहेत. त्यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

नेमकं काय म्हटलं हाके यांनी?

‘मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही, उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो – लक्ष्मण हाके’ असं हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?