AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भलाई का जमानाही नहीं रहा.. मित्राचं भांडण सोडवणं पडलं महागात; तरूणाचं डोकंच फुटलं, तिथे काय घडलं ?

अंबाजोगाईत जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर बॅट व तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. कुंबेफळ येथील शशीकांत माने यांनी एका भांडणात मध्यस्थी केल्याने आरोपींनी त्यांचा पाठलाग करून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात माने गंभीर जखमी झाले असून, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सितारा टॉकीजजवळ घडली.

भलाई का जमानाही नहीं रहा.. मित्राचं भांडण सोडवणं पडलं महागात; तरूणाचं डोकंच फुटलं, तिथे काय घडलं ?
| Updated on: Jun 22, 2026 | 1:16 PM
Share

एखादा माणूस अडचणीत सापडला असेल तर त्याची मदत करण्याचे संस्कार आपल्यालवर होतात. लोकांना मदत करावी असं आपले पालक आपल्याला सिकवतात. पण सध्याचा जमाना असा आहे कीाही एखाद्याची मदत करणं हेच खूप महागात पडू शकतं, कधीकधी तर ते जीवावरही बेतू शकतं. असाच एक अत्याच भयानक नुभव अंबाजोगाई येथे तरूणाला आला. वर्षभरापूर्वी एका इसमाला मारहाण होत असताना पीडित इसमाने मध्यस्थी करून त्याला वाचवलं, भांढण सोडवलं. पण तेच त्याला खूप महागात पडलं. कारण त्या इसमाला मारहाण करणाऱ्या आरोपींनी याचा राग मनात ठेवला आणि वर्षभराने बदला घेत, मध्यस्थी करणाऱ्या इसमालाच बेदम मारहाण केली, एवढंच नव्हे र त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. अंबाजोगाईत घडलेल्या या भयानक घटनेत शशीकांत माने गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डक्याला गंभीर दुखापत झाली, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपींविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, कुंबेफळ येथील रहिवासी परमेश्वर बाबुराव शिंपले (वय ३५) यांचा भाचा कल्याण भास्कर दंडवते याला वर्षभरापूर्वी अंबा साखर कारखान्याजवळ काही जणांनी अडवून मारहाण केली होती. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी अशोक मुकुंद मोरे याच्या सातेफळ शिवारातील शेताजवळ कल्याण दंडवते याला पुन्हा मारहाण करण्यात येत होती. मात्र तेव्हाच त्याचा मित्र शशीकांत सुधाकर माने हा मध्ये पडला. त्याने मध्यस्थी करून ते भांडण सोडवलं आणि मित्राला वाचवलं.

भलाई का जमानाही नहीं रहा..

मात्र याच गोष्टीचा राग आरोपींच्या मनात होता. याचा बदला घेण्यासाठी पूर्ववैमनस्यातून काल दुपारी आरोपींनी शशिकांतवर हल्ला चढवला. काल साडेचारच्या सुमारास आरोपी अशोक मुकुंद मोरे, सैपान उर्फ सोपियान शेख, किशोर उर्फ कृष्णा मुंडे आणि रितेश चव्हाण यांनी कुंबेफळ येथील जयप्रभा शाळेजवळ शशीकांत माने याला गाठून बॅटने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर तलवारीने वारही केला. यात शशिकांत गंभीर जखमी झाला, त्याच्या डोक्यालाही जबर दुखापत झाली. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow Us
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार