AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावर रॉकेल टाकलं अन्… मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच वृद्धाचा जीव संपवण्याचा प्रयत्न

मंत्रालय परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती नवी मुंबईचा असल्याची माहिती समोर आली आहे.

अंगावर रॉकेल टाकलं अन्... मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच वृद्धाचा जीव संपवण्याचा प्रयत्न
Old Man
| Updated on: Sep 30, 2025 | 6:18 PM
Share

मंत्रालय परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती नवी मुंबईचा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि प्रशासन सहकार्य करत नसल्याचे म्हणत या व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र मंत्रालयातील सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वृद्ध व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न

समोर आलेल्या माहितीनुसार, या वृद्ध व्यक्तीने नवी मुंबई महापालिका आणि पोलीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पालीका आणि पोलिस मदत करत नाहीत असा आरोप करत या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या व्यक्तीने सोबत रॉकेल आणले होते, हा व्यक्ती अंगावर रॉकेल ओतून घेत असताना पोलीसांना त्याला थांबवले आणि हे कृत्य करण्यापासून रोखले. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

आत्मदहनाचा प्रयत्न करणारा हा व्यक्ती कोण होता? त्याच्या अडचणी नेमक्या काय होत्या? त्याला नवी मुंबई पालिका प्रशासन आणि पोलीसांनी नेमका काय त्रास दिला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या व्यक्तीच्या मागण्या काय होत्या हेही समजू शकलेले नाही. सध्या हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीनंतर आत्मदहनाचे खरे कारण समोर येणार आहे. सध्या या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

याआधीही अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न

याआधीही अनेकांनी मंत्रालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. काही लोकांनी मंत्रालयात शिरून मंत्रालयाच्या इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे मंत्रालयात जाळी लावण्यात आलेली आहे. जरी एखाद्याने इमारतीवरून उडी घेतली तरी त्याला फारशी इजा होत नाही. वरून उडी घेतल्यानंतर व्यक्ती जाळीत अडकतो आणि त्यानंतर त्याला पोलीस आणि मंत्रालयातील सुरक्षा कर्मचारी सुखरूप बाहेर काढतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...