Omicron : मराठवाडा, विदर्भात ओमिक्रॉनचा फैलाव वाढला, उस्मानाबाद, बुलडाण्यात नवे रुग्ण

| Updated on: Dec 15, 2021 | 5:58 PM

राज्यात ओमिक्रॉनचे आज नवे रुग्ण उस्मानाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आता मराठावाडा आणि विदर्भाची चिंताही वाढली आहे.

Omicron : मराठवाडा, विदर्भात ओमिक्रॉनचा फैलाव वाढला, उस्मानाबाद, बुलडाण्यात नवे रुग्ण
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

उस्मानाबाद : मुंबई आणि उपनगरांची चिंता वाढवल्यानंतर आता ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची मराठवाडा आणि विदर्भात झपाट्याने वाढ होत आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे आज नवे रुग्ण उस्मानाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आता मराठावाडा आणि विदर्भाची चिंताही वाढली आहे. मराठवाडा आणि विदर्भातले निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.

राज्यातल्या ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 31 वर

राज्यत तीन नवे ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्याने आता ओमिक्रॉनबाधितांची संख्या 31 वर पोहोचली आहे. काल ही संख्या 28 वर होती, काल एकाच दिवसात 8 रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे.

उस्मानाबादेत ओमिक्रॉनचा शिरकाव

आता ओमिक्रॉनचा उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. उस्मानाबादेत 2 रुग्ण आढळून आले आहेत. यूएईहून बावी येथे आलेला रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने खळबळ पसरली आहे. त्यामुळेच बावीत कलम 144 लागू करण्यात आले असून गावात 5 रुग्ण आहेत, त्यापैकी दोन जणांचे अहवाल ओमिक्रॉनबाधित आले आहेत, तर इतरांचे अहवाल अजून प्रतिक्षेत आहेत. तर बुलडाण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे विदर्भाची चिंताही वाढली आहे. त्यामुळे विदर्भातही नियम कडक केले जाण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमधल्या मृत्यूनंतर सावधानतेचा इशारा

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हायरंटचा पहिला मृत्यू झालाय. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK Prime Minister Boris Johnson) यांनी ही माहिती दिलीय. या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागतंय. 30पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सिनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन करतानाच ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे. त्यामुळे भारताची चिंताही वाढली आहे.

Reliance jio कडून 1 रुपयाचा रिचार्ज सादर, 395 रुपयांमध्ये 84 दिवसांचा प्लॅन

Breaking : इम्पिरिकल डेटा गोळा झाल्यावरच निवडणूक घ्याव्यात, राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव, पुढे काय होणार?

पिंपरी- चिंचवडचा पाणीप्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ठरले ‘फुसका बार’; मोजक्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती