AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर थेट फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत नेमकं काय काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!

राज्याच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे सर्वच तालुक्यांचा समावेश या यादीत केला जाईल, असा निर्णय घेण्यात आलाय. सोबतच पालकमंत्र्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना केले.

ओमराजे निंबाळकर थेट फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत नेमकं काय काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
omraje nimbalkar and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 6:20 PM
Share

Omraje Nimbalkar : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशामुळे आहे, असे राजकीय वर्तुळात विचारले जात होते. दरम्यान आता या भेटीनंतर खुद्द ओमराजे निंबाळकर यांनीच माहिती दिली आहे. धाराशीव येथील दुष्काळाबाबत मी ही भेट घेतली होती, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.

भेट नेमकी कशामुळे, त्यांनीच सांगितलं?

मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यानंतर ओमराजे यांनी टीव्ही 9 मराठीशी बाचतित केली. यावेळी बोलताना आज मुख्यमंत्री यांची भेट घेतली. आमच्या जिल्ह्यात भिषण दुष्काळ पडला आहे. सरकारने तातडीने कर्ज काढावं आणि शेतकऱ्यांना पैशांची मदत करावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्या. त्यासाठी मी त्यांचे आभार मानले, असे ओमराजे यांनी सांगितले.

8 महिने मोठे आव्हानात्मक असणार

तसेच, दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत सर्व तालुक्यांचा समावेश केलाय ही जमेची बाब आहे. ग्राऊंडवर परिस्थिती भीषण आहे. शेतकऱ्यांना चारा छावणी, विहीर अधिग्रहण अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. पुढील 8 महिने मोठे आव्हानात्मक असणार आहेत, अस मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच मला राजकारणात पडायचं नाहीये. मी कुठलेही राजकारण करणार नाही. मी शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन काम करत राहणार, असं प्रत्युत्तरही त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना दिलं.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाला?

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. शेतकऱ्यांच्या इयत्ता दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या मुलांकडून परीक्षा शुल्कच घेऊ नका, असा आदेश फडणवीस यांनी दिलाय. तसेच राज्याच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे सर्वच तालुक्यांचा समावेश या यादीत केला जाईल, असा निर्णय घेण्यात आलाय. सोबतच पालकमंत्र्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना केले.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय