जागा एक पण रेल्वे स्थानके 2; महाराष्ट्रात कुठे आहे हे ठिकाण तुम्हाला माहितीये?

भारतीय रेल्वेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये भरपूर आहेत. जे अनेकांना माहित नाहीत. चला तर मग आज आपण आणखी एक नवीन गोष्ट जाणून घेऊयात.

जागा एक पण रेल्वे स्थानके 2; महाराष्ट्रात कुठे आहे हे ठिकाण तुम्हाला माहितीये?
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 1:47 PM

मुंबई : भारतीय रेल्वेची ( Indian Railway ) ख्याती ही जगभरातील लोकांना माहित आहे. कारण देशात भारतीय रेल्वेचं पसलेलं जाळे ही सर्वात मोठे आहे. त्यामुळेच भारतील रेल्वेला विशेष महत्व आहे. भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोकं प्रवास करत असतात. ज्यातून रेल्वेला कोट्यवधींचं उत्पन्न मिळतं. इतर गोष्टींच्या तुलनेत भारतीय रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चीक आहे. जो सर्वसामान्य लोकांपासून उच्च मध्यम वर्गीय लोकांना देखील परवडतो. भारतात असलेले प्रत्येक रेल्वे स्टेशन हे त्याच्या वेगवेगळ्या खासियतमुळे देखील ओळखले जाते. अनेक रेल्वे स्थानकांना वेगवेगळा इतिहास आहे. काही रेल्वे स्टेशन ही पर्यटकांसाठी आर्कषणाचं केंद्र ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात 2 रेल्वे स्टेशन असे आहेत जे एकाच ठिकाणी एकमेकांना लागून आहेत. अनेकदा येथे प्रवासांचा देखील गोंधळ उडतो. की त्यांची गाडी नेमकी कोणत्या स्थानकातून सुटणार आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर ( Ahamadnagar ) जिल्ह्यात दोन स्थानके ही एकमेकांच्या समोरासमोर बांधलेली आहेत. एका बाजूला आहे बेलापूर रेल्वे स्थानक आणि रुळाच्या दुसऱ्या बाजूला श्रीरामपूर रेल्वे स्थानक आहे. दोन्ही स्थानके एकमेकांपासून दूर नसून समोरासमोरच आहेत. दोन्ही स्थानकांवरून वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या धावतात. त्यामुळे भारतीय रेल्वेचे हे स्थानक आपल्या स्थानासाठी प्रसिद्ध आहे.

एकाच ठिकाणी ही दोन स्थानके असल्याने येथे येणाऱ्या नव्या प्रवाशांची तारांबळ उडते. कारण अनेकवेळा प्रवाशांना आपली गाडी नेमकी कुठल्या स्थानकावर येणार आहे. हे माहित नसतं. हे रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्थळ असलेल्या शिर्डीपासून ३७ किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर जिल्ह्यात ही दोन्ही रेल्वे स्थानके येतात.

बेलापूर ( Belapur Station ) रेल्वे स्थानक हे दौंड- मनमाड ( Daund-Manmad ) रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. अहमदनगर ( Ahamadnagar ) जिल्ह्यातील श्रीरामपूर ( Shrirampur ) शहरात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड / शिर्डी दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.

श्रीरामपूर रेल्वे स्टेशन आणि बेलापूर रेल्वे स्टेशनमध्ये फक्त रुळाचं अंतर आहे. काही रेल्वे हे बेलापूर स्थानकावर येतात तर काही श्रीरामपूर. त्यामुळे रेल्वे पकडताना नवीन प्रवाशांची नक्कीच अडचण होते.  असो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली. आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.