AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad | राज ठाकरेजी, वाघोलीकरांचं म्हणणं ऐका… इथे मंदिर-मशीदीचे हातात हात, नमाज-हनुमान चालिसा रोजच कानावर

राज्यात मंदिर-मशीदीवरून कितीही राजकारण झालं तरी आमच्या गावातील शांततेवर याचा किंचितही परिणाम होणार नाही. आमच्यातील एकजूट तसूभरही कमी होणार नाही, असा निर्धार वाघोलीकरांनी बोलून दाखवला.

Osmanabad | राज ठाकरेजी, वाघोलीकरांचं म्हणणं ऐका... इथे मंदिर-मशीदीचे हातात हात, नमाज-हनुमान चालिसा रोजच कानावर
उस्मानाबादमधील वाघोलीकरांचा एकजुटीचा निर्धार Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 08, 2022 | 6:05 PM
Share

उस्मानाबाद | मशीदींतील भोंग्यांवर नमाज पठण केले जात असेल तर मंदिरांतही भोंगे लावून हनुमान चालीसा लावा, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले असून यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मनसेतीलच (MNS) काहींनी या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या वक्तव्याला फाटा दिला. उस्मानाबादमधील एका अख्ख्या गावानेही हा वाद किती मिथ्या आहे, हे दाखवून देऊन त्याचा निषेध केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली या गावात मशीद व हनुमान मंदिर (Temple) जवळजवळ असून दोन्ही धार्मिक स्थळावरील भोंगे हे आमनेसामने आहेत. मंदिर-मशीद समोरासमोर उभे असले तरीही या गावात अनेक वर्षांपासून शांतता नांदतेय. वाघोलीकरांच्या या गावात हनुमानाचे मंदिर व मशीद जवळ जवळ आहेत. मशीदीतील नमाज आणि हनुमान मंदिरातील चालीसा, आरती सुरु असताना दररोज लोकांच्या सहज कानी पडते. मात्र त्यावर कोणीही एकमेकांवर हरकत घेत नाही. या गावात समाजिक शांतता असून हिंदू मुस्लिम सण एकत्र येऊन साजरे केले जातात.

Osmanabad Wagholi

जातीयवादाची बीजं पेरणाऱ्यांचा निषेध

वाघोली गावातील मंदिर आणि मशीदीचे स्थान गावकऱ्यांच्या मनात एक शांततेचं, श्रद्धेचं ठिकाण असं आहे. अनेकदा मुस्लिम भाविक हनुमान मंदिरात येऊन पूजा करतात. अनेक हिंदू भाविकही मशीदीत जातात. गावात जय श्री राम , हनुमान यांच्या जयघोषासह अल्लाह हू अकबर हा जयघोष एकत्र ऐकू येतो. जातीयवादाची बीजे पेरणाऱ्या लोक किंवा प्रवृत्तीसाठी वाघोली गावातील लोकांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Osmanabad Wagholi

प्रक्षोभक वक्तव्यांचा एकजुटीवर परिणाम नाही

राज ठाकरे यांनी मंदिरांत भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केल्यानंतर वाघोलीतील गावकऱ्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यात मंदिर-मशीदीवरून कितीही राजकारण झालं तरी आमच्या गावातील शांततेवर याचा किंचितही परिणाम होणार नाही. आमच्यातील एकजूट तसूभरही कमी होणार नाही, असा निर्धार वाघोलीकरांनी बोलून दाखवला.

इतर बातम्या-

VIDEO : उन्हाळा, उष्णता अन् भारनियमन; संतप्त नगरसेवकाकडून वीज वितरण कार्यालयाची तोडफोड

ST Workers Andolan : ‘साल्याला चप्पलनं मारलं पाहिजे’ पवारांच्या घरासमोर राष्ट्रवादी कार्यकर्ते-कर्मचारी आमने सामने, सदावर्तेंच्या नावानं शिवीगाळ

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत