AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याच्या लेकावर वीज काळ बनून आली, 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

अंगावर वीज पडून 14 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पारस अरुण फर्डे (Paras Arun Pharde) असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.

शेतकऱ्याच्या लेकावर वीज काळ बनून आली, 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पारस फर्डे
| Updated on: May 07, 2021 | 12:14 PM
Share

शहापूर (ठाणे) : अंगावर वीज पडून 14 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पारस अरुण फर्डे (Paras Arun Pharde) असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. शहापूर तालुक्यातील फर्डेपाडा (Phardepada) या गावात ही धक्कादायक घटना घडली. पारस हा शेतकरी कुटुंबातील होता. घरच्यांसोबत तो शेतावर गेला होता. त्यावेळी काळ बनून आलेली वीज त्याच्यावर कोसळली आणि त्याचा  मृत्यू झाला.  वीज कोसळल्यानंतर पारसला उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अवघ्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यूने फर्डे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (14 year boy died after Lightning strikes at Shahapur Thane Pre monsoon rains)

शहापूर तालुक्याला पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढलं आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे घरांचे पत्रे उडणे, उन्हाळी लागवड केलेल्या शेतीचे नुकसान होणे, वीज पडणे आशा घटना घडत आहेत. मात्र गुरुवारी कोसळलेल्या वीजेने फर्डे कुटुंबाचं होत्याचं नव्हतं केलं.

शहापूर तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका

शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने घरांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याचा फटका एका गरीब शेतकऱ्याला बसला. शेणवे गावातील शेतकरी विलास अण्णा पडवळ यांच्या घराचे छप्पर उडाले. गरीब कुटुंबाचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.

Shahapur rain update

Shahapur rain update

एककीडे कोरोनाचे सावट असल्याने रोजगार नाही. अगदी धावपळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात आहे. अशा परिस्थितीत विलास पडवळ यांच्या संकटात आणखी भर पडली. खरंतर अशाच प्रकारे तीन वर्षा पूर्वी वादळी वाऱ्यात घराचा एक भाग कोसळून पडून पत्र्यांची नासधूस झाली होती. आता पुन्हा एकदा आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे विलास अण्णा पडवळ यांच्या घराचे छप्पर उडाले. शिवाय भिंत कोसळली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या  

Weather report : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, कुठं शेतीचं नुकसान, तर कुठं वीज पडून मृत्यू

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.