कोल्हापूर जिल्ह्यासाठी लसीचे 60 हजार डोस, लसीकरणाला आठवड्याभरानंतर सुरुवात

| Updated on: Jul 10, 2021 | 1:58 PM

कोरोना प्रतिबंधक लसीचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे ठप्प झालेलं कोल्हापूर जिल्ह्यातील लसीकरण जवळपास आठवडाभरानंतर आज पुन्हा एकदा पूर्ववत झालंय. (60 thousand corona Vaccine Dose After one Week Start Vaccination in kolhapur)

कोल्हापूर जिल्ह्यासाठी लसीचे 60 हजार डोस, लसीकरणाला आठवड्याभरानंतर सुरुवात
कोरोना लसीकरण
Follow us on

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ठप्प झालेलं कोल्हापूर जिल्ह्यातील लसीकरण जवळपास आठवडाभरानंतर आज पुन्हा एकदा पूर्ववत झालंय. आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवे 60 हजार लसीचा डोस उपलब्ध झाले असून शहर आणि ग्रामीण भागातील केंद्रावर लसीचं वितरण जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. (60 thousand corona Vaccine Dose After one Week Start Vaccination in kolhapur)

नागरिकांना दिलासा

उपलब्ध लसीमध्ये प्राधान्यानं दुसरा डोस असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जात असून लस उपलब्ध होताच लसीकरण केंद्रांवरून नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झालेल्या लोकांना फोनद्वारे केंद्रांवर बोलावून घेतलं जातंय.. गेले आठवडाभर लसीकरण केंद्रांवर फेऱ्या मारून संतापलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आज मात्र काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

10 लाख लोकांचा पहिला डोस पूर्ण, साडेतीन लाख लोकांचा दुसरा डोस

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत दहा लाख लोकांनी आपला पहिला डोस पूर्ण केलाय तर साडेतीन लाखाहून अधिक लोकांचा दुसरा डोस पूर्ण झालाय.

लसीकरणाला वेग येण्याची अपेक्षा

आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवे 60 हजार लसीचा डोस उपलब्ध झाले असून शहर आणि ग्रामीण भागातील केंद्रावर लसीचं वितरण जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. जादा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने जिल्ह्यातील लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

लसीकरण केंद्रावर वशिल्याचे प्रकार

एकीकडे अपुऱ्या लसीमुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. लस मिळविण्यासाठी तासंतास लसीकरण केंद्रावर बाहेर उभं रहावं लागत होतं. दुसरीकडे मात्र लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आपल्या नातेवाईक आणि कुटुंबीयांना वशिल्याने लस देण्याचे प्रकार घडत होते. रुग्णालयातील असा प्रकार दोन दिवसापूर्वी नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता.

आठवडाभर लसीकरण होते बंद

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढ कायम असल्यामुळे नागरिकांचा लसीकरणासाठी प्रतिसाद मिळतोय. गेल्या काही दिवसापासून पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती. उपलब्ध होत नसल्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राबाहेर तसे फलक पाहायला मिळत होते. जिल्ह्यात अनेक लोकांचे पहिला डोस घेऊन 90 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत असेल लोक वारंवार लसीकरण केंद्राकडे चकरा मारत होते. अनेकांना घेण्यासाठी घेण्याबाबत मेसेज येत होते मात्र प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर मात्र लस उपलब्ध नसायची. या सगळ्या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत होता.

(60 thousand corona Vaccine Dose After one Week Start Vaccination in kolhapur)

हे ही वाचा :

सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर सक्तीचा, अन्यथा फौजदारी कारवाई होणार, कोल्हापूरमध्ये कडक निर्बंध