Tarapur MIDC Fire : तारापूर एमआयडीसीमध्ये अग्नीकल्लोळ, केमिकल कंपनीला भीषण आग, परिसरात धुराचे लोट

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात येत नसल्यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची भीती अग्नीशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Tarapur MIDC Fire : तारापूर एमआयडीसीमध्ये अग्नीकल्लोळ, केमिकल कंपनीला भीषण आग, परिसरात धुराचे लोट
तारापूर एमआयडीसीमध्ये अग्नीकल्लोळ, केमिकल कंपनीला भीषण आग
Image Credit source: TV9
प्रवीण चव्हाण

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 29, 2022 | 2:09 AM

बोईसर : बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियर इंटरमीडिय टस या केमिकल कंपनी (Chemical Company)ला भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ पसरले असून, स्थानिक रहिवाशांमध्येही हाहाकार उडाला आहे. कंपनीला लागलेल्या आगीमुळे एकापाठोपाठ एक 8 मोठं मोठे स्फोट (Blast) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात येत नसल्यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची भीती अग्नीशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ज्वलनशील पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने आगीचा भडका उडाल्याचा अंदाज

पालघर जिल्ह्यातील तारापुर एमआयडीसीमध्ये अलिकडच्या काळात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यांपूर्वीही येथील एका केमिकल प्लांटला भीषण आग लागून परिसरात मोठा हलकल्लोळ माजला होता. ती घटना ताजी असतानाच आज, मंगळवारी रात्री आणखी एक केमिकल कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. या आगीचे स्वरुप भीषण असून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांपुढे आहे. स्थानिक पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने आगीचा प्रचंड भडका उडाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

आगीच्या धुरामुळे आसपासच्या रहिवाशांचा श्वास घुसमटला

केमिकल कंपनीला लागलेल्या आगीपासून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना श्वास घेण्यात त्रास जाणवू लागला आहे. रात्रीचा अंधार असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडथळा येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. आग विझविण्यासाठी आणखी काही तास लागतील, अशी शक्यता आहे. आगीमुळे कंपनीत लागोपाठ स्फोट होत आहेत. त्याचे शक्तीशाली हादरे बसत असल्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून जिवीत वा वित्तहानीबाबतही कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीत केमिकल कंपनीतील प्रोडक्ट मॅनेजरचा होरपळून मृत्यू झाला होता.  (A huge fire broke out at a chemical company in Tarapur MIDC)


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें