J&K Terrorist : कुपवाड्यात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट उधळला; दोघांचा खात्मा

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा देत कारवाईची अधिक माहिती दिली. मंगळवारी त्यांनी सांगितले की, ठार झालेले दोघेही दहशतवादी हे स्थानिक रहिवासी होते. ते दोघे शस्त्रे आणि औषधांचा साठा गोळा करण्यासाठी या भागात आले होते. ते घुसखोरांना मदत करण्याचाही प्रयत्न करत असावेत. माजीद चेची आणि समसुद्दीन बेग अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत.

J&K Terrorist : कुपवाड्यात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट उधळला; दोघांचा खात्मा
स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवादी कट उधळला
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 28, 2022 | 10:01 PM

श्रीनगर : उत्तर कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरी (Infiltration)चा कट उधळून लावला. केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या दोन दहशतवाद्यां (Terrorist)ना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. ठार झालेल्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे (Weapon) आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. क्रॉस फायरिंगच्या घटनेदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती जम्मू-कश्मीर पोलिसांनी दिली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. केरन सेक्टरमधील स्कॉर्पियन भागात दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांची हालचाल निदर्शनास येताच सतर्क जवानांनी तातडीने त्या दिशेने धाव घेतली.

यादरम्यान दहशतवाद्यांनीही सुरक्षा दलांच्या जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर देत केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. यादरम्यान दोन दहशतवादी पळून गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून सहा एके-47 रायफल, चार ग्रेनेड, मॅगझिन आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लष्कराकडूनही घटनेबाबत दुजोरा

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा देत कारवाईची अधिक माहिती दिली. मंगळवारी त्यांनी सांगितले की, ठार झालेले दोघेही दहशतवादी हे स्थानिक रहिवासी होते. ते दोघे शस्त्रे आणि औषधांचा साठा गोळा करण्यासाठी या भागात आले होते. ते घुसखोरांना मदत करण्याचाही प्रयत्न करत असावेत. माजीद चेची आणि समसुद्दीन बेग अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत. लष्करानेही घटनेबाबत दुजोरा दिला आहे. लष्कराने म्हटले आहे की, 28 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केरन सेक्टरमधील इंडिया गेट-बिचू परिसरात कुंपणाजवळ काही लोक संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यावेळी सुरुवातीला दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या क्रॉस फायरिंगमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. (In Kupwada district of north Kashmir security forces foiled an infiltration plot by terrorists)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें