Video | वारणेकाठी आढळली तब्बल 12 फुटांची अजस्त्र मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

| Updated on: Jul 31, 2021 | 11:55 PM

वारणा नदीकाठी कवठेपिरान गावाजवळ तब्बल 12 फुटांची एक असस्त्र मगर सापडली आहे.

Video | वारणेकाठी आढळली तब्बल 12 फुटांची अजस्त्र मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
crocodile video
Follow us on

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे येथे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. वारणा नदीकाठी कवठेपिरान गावाजवळ तब्बल 12 फुटांची एक असस्त्र मगर सापडली आहे. एवढी मोठी मगर आढळल्यामुळे येथे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (after flood in sangli crocodile of 12 feet has been found near Kavathe Piran village)

कवठेपिरान येथे कारंदवाडी रस्त्यावर आढळली मगर

सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेला महापूर ओसरला आहे. मात्र नदीकाठच्या गावांमध्ये एक नवं संकट निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णाकाठी अनेक ठिकाणी मगरींचा मुक्त वावर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीवाडी गावाजवळ एक 12 फुटी महाकाय मगर पकडण्यात आली होती. अशीच एक मगर वारणा नदीकाठी असणार्‍या कवठेपिरान येथे कारंदवाडी रस्त्यावर पकडण्यात आली आहे. एका शेतात ही मगर आढळून आली.

शर्थीच्या प्रयत्नांतर मगरीला केलं जेरबंद 

मगर दिसल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क केला. त्यानंतर वन विभाग आणि ग्रामस्थांनी मिळून तब्बल 12 फुटी मगरीला अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले. रात्री उशिरापर्यंत मगर पकडण्याचे काम सुरू होते. त्यानंतर अजस्त्र अशा मगरीला वनविभागाने ताब्यात घेतले.

पाहा व्हिडीओ :

नागरिकांत भीतीचे वातावरण

दरम्यान, नंतर वन विभागाने त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले. मात्र मगरींचा मुक्त वावर कृष्णा आणि वारणा नदीकाठी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्रावर नवं संकट, राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट

चिथावणीखोर वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची पलटी, माध्यमांनी विपर्यास केल्याचा केल्याचा कांगावा, नेमकं काय घडलं?

आधी गोड बोलून निर्जन स्थळी नेले, नंतर चाकूचा धाक दाखवत पैशांची लूट, 2 तरुणांना अवघ्या 18 तासांत बेड्या

(after flood in sangli crocodile of 12 feet has been found near Kavathe Piran village)