चिथावणीखोर वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची पलटी, माध्यमांनी विपर्यास केल्याचा केल्याचा कांगावा, नेमकं काय घडलं?

प्रसाद लाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. तर, शिवसेना नेते सचिन आहिर यांनी शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. फुटपाथवर येऊन दाखवावं त्याना शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

चिथावणीखोर वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची पलटी, माध्यमांनी विपर्यास केल्याचा केल्याचा कांगावा, नेमकं काय घडलं?
प्रसाद लाड, भाजप आमदार
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 31, 2021 | 11:13 PM

मुंबई: भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर  प्रसाद लाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. तर, शिवसेना नेते सचिन आहिर यांनी शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. फुटपाथवर येऊन दाखवावं त्याना शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसाद लाड यांच स्पष्टीकरण

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही. माझं स्पष्ट म्हणनं होतं की, माहिममध्ये जेव्हा येतो तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. ती बातमी विपर्यास करून दाखवली आहे.माझं हे स्पष्टीकरण आहे, मला कुठल्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बाधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणाले.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजीं निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “एवढी तुमची आमची भीती तुमची आमची की ह्यांना असं वाटतं की हे माहिम मध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत.काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

शिवसेना भवन च्या फुटपाथवर येऊन दाखवा ते आमचं मंदिर, सचिन आहिर यांचं प्रत्युत्तर

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेतून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. शिवसेना नेते सचिन आहिर यांनी देखील प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी किती बोलावे आणि काय बोलावं हे लक्षात घ्यायला पाहिजे. कोण प्रसाद लाड त्यांना माहीत नाही का शिवसेना भवनवर आधी कोणाला किती प्रसाद मिळाला आहे. कोणीही प्रसिद्धीसाठी वाटेल ते वक्तव्य करू नये, असा इशारा सचिन आहिर यांनी दिला आहे.

शिवसेना भवनच्या फुटपाथवर येऊन दाखवा ते आमचं मंदिर आहे. त्यांना शिवसेना स्टाईल उत्तर देऊ. बाळासाहेबांचा शिवसैनिक आजही सेनाभवनला आपल्या ह्रद्यात ठेवतो. माहीम, दक्षिण मुंबई परिसरात शिवसेना काय आहे, हे विरोधकांना माहिती आहे. भाजपनं अशी 100 कार्यालय खोलली तरी शिवसेनेला फरक पडणार नाही, शक्तिप्रदर्शन करून काही फायदा होणार नाही, असं प्रत्युत्तर शिवसेना नेते सचिन आहिर यांनी प्रसाद लाड यांना दिलं.

इतर बातम्या:

…वेळ आली तर सेनाभवन फोडू, प्रसाद लाड यांचं चिथावणीखोर वक्तव्य

बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल

BJP Leader Prasad said his speech misinterpreted by media over Controversial statement said if time comes they will attack on Shivsena Bhavan

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें