AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…वेळ आली तर सेनाभवन फोडू, प्रसाद लाड यांचं चिथावणीखोर वक्तव्य

भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे.

...वेळ आली तर सेनाभवन फोडू, प्रसाद लाड यांचं चिथावणीखोर वक्तव्य
प्रसाद लाड, भाजप आमदार
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 11:02 PM
Share

मुंबई: भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. शिवसेनेवर प्रसाद लाड यांच्यासह नितेश राणे यांनी देखील घणाघाती टीका केली.

सेनेच्या कुंडल्या आमच्याजवळ

दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत.मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत, असा इशारा प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिला. शिवसेनेला वाटत की आम्ही माहीम मध्ये आल्यावर सेनाभवन फोडू तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी यावेळी केलं.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजीं निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “एवढी तुमची आमची भीती तुमची आमची की ह्यांना असं वाटतं की हे माहिम मध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत.काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

माहीमध्ये 5 नगरसेवक निवडून आणणार

माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किमान 5 नगरसेवक निवडून आणणार आहोत, असं प्रसाद लाड म्हणाले. किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही ते म्हणाले. शिवसेनेला ताकद देण्याचं काम आम्ही केलं आता त्यांची ताकद तोडायचं काम आम्ही करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

पुढच्या वेळी आम्ही इतके कार्यकर्ते घेऊन येणार नाही. आमच्या कार्यक्रमाला पोलीस इतके असतात. मात्र, आम्हाला त्याची गरज नाही. पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये यावं, असंही प्रसाद लाड म्हणाले.

सदा सरवणकर यांचं प्रत्युत्तर

शिवसेनेची शाखा म्हणजे आम्ही मंदिर मानतो. त्यातून लोकांची सेवा करतो. भाजपानं सुद्दा शाखेच्यामध्यामातून समाज सेवाचं करावी. त्यांनी कार्यालय युद्ध खेळण्यासाठी नाहीय हे समजावं. भाजपचे नेते या आधीही सेनाभवनावर भुंकले होते. शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांचं कोणी वाकड करु शकत नाही. सेनेवर आरोप करणारी व्यक्ती वैचारिक दिवाळखोरी असलेली आहे.दादारमधील लोकांना समाजसेवाची गरज आहे युद्धाची नाही. छत्रपतींच्या नावचा वापर भाजपकडूनही केला गेला आहे.महापालिकेची स्वप्न यांनी बघू नव्हेत, असं शिवेसना आमदार सदा सरवणकर म्हणाले.

शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर, नितेश राणेंची टीका

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं उद्घटान करण्यात आलं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले.

इतर बातम्या:

बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल

नितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का? केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला

BJP Leader Prasad Controversial statement said if time comes they will attack on Shivsena Bhavan

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.