“संजय राऊत यांची मानसिकता मेंटली लेव्हल 5 वर होती ती आता 7 वर गेली”; सरकार पडणार यावर भाजप नेत्यानं राऊतांना वेड्यात काढलं

| Updated on: Apr 25, 2023 | 5:19 PM

अजित पवार यांच्यासंदर्भात त्यांचे पक्षात जो काही उत्साह दिसतो, त्यावरून त्यांनी म्हटले आहे की, कार्यकर्त्यांच्या मनात वेगळी भावना आहे तर नेत्यांच्या मनात वेगळी भावना आहे असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

संजय राऊत यांची मानसिकता मेंटली लेव्हल 5 वर होती ती आता 7 वर गेली; सरकार पडणार यावर भाजप नेत्यानं राऊतांना वेड्यात काढलं
Follow us on

अहमदनगर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांकडून वारंवार सरकार पडणार, सरकार पडणार अशी शक्यता वर्तवली जाते. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांविषयी अजून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची टीका केली जाते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने कायद्याचे संदर्भ देऊन त्यांच्याकडून हे सरकार कोसळणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावरूनच सत्ताधारी आणि भाजपकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे.

शिंदे गटाकडून त्यांच्यावर अनेक वेळा पातळी सोडून टीका केली गेली आहे. तर आता भाजपकडूनही जोरदार टीका केली जात आहे.

आज पुन्हा एकदा भाजपचे खासदार सुजय विखे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी अगदी त्यांची मानसिकता ही मेंटल लेव्हलवरची असल्याची टीका केली आहे. त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे गट असा वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

खासदार संजय राऊत यांनी नुकताच म्हटले आहे की, येत्या पंधरा दिवसात ह सरकार पडेल. त्यांच्या या भूमिकेवर मत व्यक्त करताना खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांची मानसिकता ही मेंटल ठरवत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

त्यांच्याविषयी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांची मानसिकता मेंटली लेव्हल 5 वर होती ती आता 7 वर गेली असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यांची मेंटल लेव्हल ही पाचवरून सात वर गेल्यामुळे त्यांना आता लवकरच थेरपीमध्ये अॅडमिट करावे लागेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या बॅनर वरून सुजय विखे पाटील यांनी त्यांना टोला लगावला आहे.

अजित पवार यांच्यासंदर्भात त्यांचे पक्षात जो काही उत्साह दिसतो, त्यावरून त्यांनी म्हटले आहे की, कार्यकर्त्यांच्या मनात वेगळी भावना आहे तर नेत्यांच्या मनात वेगळी भावना आहे असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

जेव्हा आपल्या नेत्याला संधी मिळणार नाही तेव्हा कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचे अस्तित्व सिद्ध करावं लागतं असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.